साईसंस्थान कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगातील तरतुदींनुसार १०,२०,३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणाऱ्या योजनेचा लाभ द्यावा---- संस्थान सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार यांची डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे मागणी





शिर्डी (प्रतिनिधी) 
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अस्थापनेवर काम करत असलेल्या कायम कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसाद १०,२० व ३० वर्षाची सेवा हि सात ते आठ वर्षापुर्वीच पुर्ण झालेली असुनहि कर्मचाऱ्यांना अद्याप आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

यापुर्वी संस्थान कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगात समाविष्ठ असलेली १२, २४ व ३६ वर्षाची सेवा पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना हि योजना लागु करुन सुधारीत वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आलेला होता. त्याच धर्तीवर दिनांक ०१ जानेवारी २०१६ पासुन पुर्वलक्षी प्रभावाने ७ वेतन लागु करण्यात आलेला असुन ७ व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०, २० व ३० वर्षाची सेवा पुर्ण केलेल्या संस्थान कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेनुसार सुधारीत वेतन श्रेणी लागु व्हावी. शासन दरबारी आपण व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच सन २००६ मध्ये १०५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत सामावुन घेण्याचा ऐतेहासिक निर्णय झालेला आहे. तसेच ५९८ कायम कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न हि आपल्यामुळेच मार्गी लागत आहे. आपण संस्थान कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे आहात व संस्थान कर्मचाऱ्यांचे बाबतीत आपला नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन राहिलेला आहे व यापुढे हि राहिल यात शंका नाही. तरी आपण या प्रकरणात वैयक्तीक लक्ष घालुन आपल्या स्तरावरुन संस्थान तदर्थ समिती तसेच शासन दरबारी पाठपुरावा करुन कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०, २० व ३० वर्षाची सेवा पुर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या आश्वाशित योजनेचा लाभ तसेच कर्मचाऱ्यांचे इतर प्रलंबीत प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनाव्दारे चेअरमन विठ्ठल पवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments