टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेले श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील' वरद गजानन' उत्सव सोहळ्यास आज बुधवार दि. 27 ऑगष्ट रोजी श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाक्चौरे यांचे हस्ते, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक अरूण धनवडे या प्रमुख मान्यवरांचे उपस्थीतीत मोठ्या उत्सहपुर्ण वातारणात धर्मध्वजाचे ध्वजारोहनाने आरंभ होत आहे.
येथे श्रीसंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे त्रिशतकोत्तर सोहळ्या निमीत्ताने गाथापारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमीत्ताने दररोज दुपारी मान्यवर महाराजांचे प्रवचन व त्यानंतर किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती गुरूवर्य, शांतीः ब्रम्ह, महंत भास्करगीरीजी महाराज यांचे कृपाशिर्वादाने गेल्या 41 वर्षापासून सुरू असलेल्या हा पारायण सोहळा श्रीक्षेत्र देवगडचे महंत, स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली व श्रीक्षेत्र आंबेजोगाई येथील मुकुंदराज स्वामी संस्थानचे मठाधिपती किसन महाराज पवार, श्रीक्षेत्र हनुमानगड येथील संतोष महाराज चौधरी, श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील कृष्णामहाराज वाघुले, श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील भरत महाराज नरोडे, श्रीक्षेत्र कारवाडी येथील संदिप महाराज जाधव यांचे अधिपत्याखाली हा सोहळा संपन्न होत आहे.
यात आज बुधवार दि. 27 ऑगष्ट रोजी सकाळी 6 वा. अखंड ज्योती प्रज्वलन व महापुजा आरंभ होत आहे. सकाळी 7 वा. धर्मध्वजाचे ध्वजारोहन श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाक्चौरे यांचे हस्ते, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक अरूण धनवडे या मान्यवरांच्या हस्ते व उपस्थीती होत आहे. सकाळी 8 वा. गणेश यात्रा संपन्न होत आहे. त्यानंतर दररोज सकाळी 6 वा. महाआरती, सकाळी 7.30 वा. गाथा पारायण, दुपारी 1.30 वा. प्रवचन, दुपारी 3 वा. किर्तन, सायंकाळी 5 वा. हरीपाठ याप्रमाणे कार्यक्रम संपन्न होत आहे.
यात बुधवार दि. 27 ऑगष्ट रोजी श्रीक्षेत्र भोकर येथील श्री विठ्ठल सेवाश्रमाचे मठाधिपती सुदाम महाराज चौधरी यांचे प्रवचन तर खोकर येथील श्री गोरक्षनाथ संस्थानचे मठाधिपती सेवानाथ महाराज यांचे किर्तन, गुरूवार दि. 28 ऑगष्ट रोजी श्रीक्षेत्र श्रीरामपूर येथील माऊली महाराज गुंजाळ यांचे प्रवचन तर श्रीक्षेत्र हनुमानगड येथील संतोष महाराज चौधरी यांचे किर्तन, शुक्रवार दि. 29 ऑगष्ट रोजी श्रीक्षेत्र तिळापूर येथील मच्छींद्र महाराज चोरमले यांचे प्रवचन तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, बोरी येथील विनोदाचार्य विलास महाराज गेजगे यांचे किर्तन, शनीवार दि. 30 ऑगष्ट रोजी श्रीक्षेत्र योगेश महाराज होन यांचे प्रवचन तर श्रीक्षेत्र पैठण येथील योगीराज महाराज गोसावी यांचे किर्तन, रवीवार दि. 31 ऑगष्ट रोजी श्रीक्षेत्र वांगी बु॥ येथील कु. राजकीशोरी माने यांचे शास्त्रीय गायन व अभंगवाणी तर श्रीक्षेत्र गेवराई येथील किर्तन केसरी अक्कुर महाराज साखरे यांचे किर्तन, सोमवार दि. 1 सप्टेबर रोजी सकाळी 9 वा. श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती शांती ब्रम्ह गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज यांची सदीच्छा भेट होत आहे त्याच बरोबर राहुरी तालुक्यातील शेटेवाडी महिला भजनीं मंडळाचे भजन व श्रीक्षेत्र पढेगाव येथील सदाशिव रामकुवर महाराज यांचे प्रवचन तर श्रीक्षेत्र थोर महालगाव येथील महंत विश्वनाथगीरी महाराज यांचे किर्तन, मंगळवार दि.2 सप्टेबर श्रीक्षेत्र गणेशखिंड येथील वरद गजानन वारकरी शिक्षण संस्थेचे वैष्णवीदीदी नरोडे महाराज यांचे प्रवचन तर श्रीक्षेत्र आळंदी येथील जोगी महाराज संस्थानचे उमेश महाराज दशरथे यांचे किर्तन, बुधवार दि. 3 सप्टेबर रोजी श्रीक्षेत्र कारेगाव येथील योगेश महाराज मोरगे यांचे प्रवचन तर श्रीक्षेत्र खैरी निमगाव येथील स्वर भास्कर बाहासाहेब महाराज रंजाळे यांचे किर्तन, गुरूवार दि. 4 सप्टेबर रोजी श्रीक्षेत्र कारवाडी येथील कारवाडी आश्रमाचे संदिप महाराज जाधव यांचे प्रवचन तर श्रीक्षेत्र पंढरपूर येथील वैजीनाथ महाराज जगदाळे यांचे किर्तन, शुक्रवार दि. 5 सप्टेबर रोजी श्रीक्षेत्र बहीरवाडी लक्ष्मण महाराज नांगरे यांचे प्रवचन तर श्रीक्षेत्र सराला बेट येथील योगीराज सद्गुरू गंगागीरी महाराज संस्थानचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांचे किर्तन तर शनीवार दि. 6 सप्टेबर या अनंत चतुर्दशीच्यादिवशी सकाळी 9 वा. श्रीक्षेत्र देवगडचे महंत स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
0 Comments