विद्यार्थ्यांसाठी ॲबट संकुलाने विद्यार्थ्यांसाठी राबविला आगळावेगळा उपक्रम


       
भिंगार: येथील श्रीमती अॅबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनिअर आर्टस् कॉलेज व Prosperity Finserv कंपनीच्या वतीने विद्यालयात इ.१२ वी उत्तीर्ण व प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी  भव्य नोकरभरती  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 
            या मेळाव्याचे उद्घाटन  विद्यालयाचे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी  प्रमोद तोरणे , Prosperity Finserv कंपनीचे संचालक श्री.मुकुल थोरात  कंपनी स्टाफ , विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीम.कविता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालायातील शिक्षकवृंद तसेच पालक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या नोकर भरती मेळाव्याला मिळाला. याप्रसंगी प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोलाचे मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला. विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी ही कंपनीच्या स्टाफ सोबत मोकळ्या मनाने चर्चा केली.
          याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मुस्तकीम पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.संदीप झावरे यांनी केले तर आभार श्री.शंकर मोरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments