दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी- शनिदेवगांव येथील गोदातीरांवर असलेल्या पुरातन शनैश्वर मंदिरास १७८ व्या गंगागिरी महाराज सप्ताह काळात लाखो भाविकांनी भेट देऊन दर्शन घेतले, सप्ताह सांगतेच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोभांवे दर्शन घेतले. सप्ताह काळात २० लाखांहून अधिक भाविकांच्या व राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या दर्शनाने शनिदेवगांवच्या शनैश्वर देवस्थानची महती शनिशिंगणापूर प्रमाणे राज्यभर पसरली आहे.
वैजापूर श्रीरामपूर तालुका हद्दीवर कमालपूर नजीक बाराही महिने जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर निसर्गमय गोदावरीच्या कुशीत वसलेल्या पुरातन जागृत शनैश्वर मंदिराचा जीर्णोद्धार दहा वर्षांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. शनिदेव ग्रामस्थांच्या आग्रहावरून शनैश्वर ट्रस्ट विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद महंत रामगिरी महाराज यांच्याकडे ठेवण्यात आले. या संपुर्ण जिर्णोध्दार महाराजांच्या संकल्पनेतून व आमदार रमेश बोरनारे यांच्या सहकार्यातुन शनिदेवगांवसह पंचक्रोशीतल्या गावोगावच्या शनिभक्तांच्या देणगीतून करण्यात आला. दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता शनैश्वर महाराजांची महाआरती आरती घेण्यात येते.आरती अगोदर वेगवेगळ्या नामवंत महाराजांचे प्रवचन किर्तन असते.वैजापुर, गंगापूर, श्रीरामपूर येथील व्यापारी शनीभक्तासह पंचक्रोशीतल्या भक्तांची महाप्रसाद पगंत असते. या महाप्रसाद पगंती घेण्यासाठी महिना महिना नंबर लागत नाही. याशिवाय शनीजयंती व शनी अमावस्या दिवशी देवस्थानवर भरगच्च धार्मिक स़ोहळा पार पडतो.या स़ोहळा काळांत भव्य यात्रेचे स्वरूप आलेले असते. देवस्थान वैजापूर गंगापूर तालुक्याशी पक्क्या डांबरी रस्त्याने जोडले गेले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शनि भक्तांची अडचण सप्ताह निमित्ताने दुर झाली आहे.केटीवेअर पासून ४०फुट रूदीचा रस्ता देवस्थान पर्यंत तयार करण्यात आलेला आहे. आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे डांबरीकरण अथवा क्राक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
शनिशिंगणापूर प्रमाणे शनिदेवगाव देवस्थानची महती राज्यभर पसरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
शनैश्वर देवस्थान वरून पुरातन काळापासून गावांचे नांव शनिदेवगांव असे पडलेले आहे. शनिदेवगांव सप्तक्रोशी या नावाने योगीराज सद्गुरू गंगागिरी सप्ताहामुळे गांव राज्यांच्या नकाशावर झळकले या सप्ताहात ३० जुलै ते ६.ऑगस्ट २०२५ दरम्यान सप्ताहास २५ लाखाहुन अधिक भाविक येऊन गेले. त्यापैकी २० लाख भाविकांनी या पुरातन शनैश्वर देवस्थानचे दर्शन घेतलयांची नोंद देवस्थान वर झालेली आहे. सांगता प्रसंगी हेलिपॅड वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा सर्वप्रथम शनैश्वर मंदीरी पोहोचला. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मुख्यमंत्री मह़ोदयांनी मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. दर्शनानंतर गोदातीरावरील जायकवाडी पाणलोट क्षेत्र निसर्गरम्य परिसर पाहुण त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत अहिल्यानगरचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन, आमदार रमेश बोरनारे, धनजंय धोर्डे, दिनेश परदेशी, शिल्पा परदेशी, अविनाश पाटील गलांडे, डॉ ,वंदना मुरकुटे , भाजपचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, अशोक चे संचालक निरंजन मुरकुटे,सिताराम भराडे ,प्रविण मेघळे, माजी सरपंच सचिन मुरकुटे,सरपंच संजय मेघळे आदी उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने योगानंद महाराज व व्यवस्थापक राजेंद्र मेघळे सर यांनी मुख्यमंत्री महोदयांसह सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
0 Comments