टाकळीभान प्रतिनिधी-सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताह निमित्ताने लाखो भाविकांचे उपस्थितीत मला महंत रामगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने लाभ मिळाल्याने मी माझं भाग्य समजतो असे भावनिक उद्गार अहिल्यानगरचे पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी शनिदेवगांव येथे काढले,
पवित्र गोदावरी गंगा मातेच्या मात लाखो भाविकांचे उपस्थितीत गोदावरी तीरावर शनिदेवगांव सप्तक्रोशी येथे सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज १७८ व्या सप्ताहाचे प्रारंभी पवित्र गोदावरी गंगेचे पुजन करण्यात आले होते. सप्ताह सांगतेच्या पूर्व संध्येला आज सायंकाळी ७ वाजता अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते गोदावरी ग़गेची लाखों भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुंजे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्यासह प्रचंड पोलिस बंदोबस्तातील शेकडो पोलीस कर्मचारी हजर होते. वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, श्री व सौ. अविनाश गलांडे व श्री व सौ मधुकर महाराज हे सपत्नीक आरतीस ऊपस्थित होते.डॉ वंदनाताई मुरकुटे, कमलपूलचे सरपंच स्वातीताई मुरकुटे , यांच्या सह लाखो महिला पुरुष आबालवृद्ध भाविकांनी या डमरू पथक वाद्य समुहाचे नादाचा आनंद घेतला.प्रविण सावंत यांच्या डमरू पथकाने भाविकांची मने जिंकली.
उपसरपंच शैलेश मेघळे,प्रमोद मेघळे, महेशं पवार आदींनी या महाआरती चे उत्कृष्ट नियोजन केले.
0 Comments