शुक्रवारी पोळा असून अनेक ठिकाणी मातीचे बैल विक्रीसाठी दिसून येत आहेत. छोटे मोठे रंगीबेरंगी मातीचे बैल लहान मुलांचे तर आकर्षण ठरत आहे. महिनाभरापासून कुंभार कारागीर मातीचे बैल बनवण्यात दंग होते. आज पोळा असल्यामुळे मातीच्या बैलांची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरी भागामध्ये मातीचे बैल घेण्यासाठी सकाळपासूनच बाजार मध्ये गर्दी दिसून येत होते. अहिल्यानगर जिल्ह्यात श्रावणी अमावस्याला पोळा असतो. तर पुणे जिल्ह्यात भाद्रपद अमावस्येला पोळा साजरा केला जातो. त्यामुळे येथे मातीचे बैल विक्री झाले नाही व शिल्लक राहिले तर अनेक कुंभार कारागीर हे पुणे जिल्ह्यात ही मातीचे बैल विक्रीसाठी घेऊन जात असतात.कच्या मालाच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे मातीचे बैलांची किंमतही वाढली मात्र शेतकरी तसेच ज्यांच्याकडे बैल नाही ते मातीचे बैल घेण्यासाठी उत्साही आहेत. गेल्या दोन दिवसापासून पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत. त्यामुळे पोळासण आनंदात साजरा होणार आहे. घरोघर मातीच्या बैलांची मनोभावे पूजा केली जाते. त्यामुळे मातीचे बैल खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी होत आहे.असे चंद्रकांत बोरसे या कारागिरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
0 Comments