पोळा हा बैलांप्रती ,असलेला कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असून हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात विशेष त विदर्भात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतकरी आपल्या बैलांना सजविण्यासाठी विशेष तयारी करतात छान पैठणी विविध रंगाची कपडे आणि शिंगांना रंग लावून आकर्षक बनवितात या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते.
त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखविला जातो पुरणपोळी कडी भजी असे पारंपारिक व बाजरी, गहू हे आपले शेतातील कडधान्य पीक सुपामध्ये घेऊन बैलांना ओवाळून त्यांची पूजा करून त्यांना ते चारतात व पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा त्यांना भरविला जातो प्रत्येक गावा आपोआपल्या कुलदैवतांच्या मंदिरात बैल घेऊन बैलांची आरती पूजा केली जाते व गावाच्या वेशीतून सर्व गावातील बैल जोड्या एक लाईनीत ढोल ताशांच्या गजरात बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जातात ज्यांच्याकडे बैल नाही ते विशेषतः शहरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा केली जातात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातात पोळा हा सण केवळ बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा नसून वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात अतिशय कष्ट करून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा हा बैल म्हणजे शेतकऱ्याच्या साठी तो तेव्हा देवा समान त्याची पूजावत सण समजला जातो ग्रामीण भागातील जीवनशैलीतील परंपरा आणि एकतेचे दर्शन घडविले चा सण आहे.
0 Comments