शिर्डी (प्रतिनिधी) गोवा राज्याचे आरोग्य, नगर व ग्राम नियोजन, महिला व बालविकास आणि वने, मंत्री नामदार विश्वजीत राणे यांनी शनिवारी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर शिर्डीत येऊन व श्री साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री गुरुस्थान मंदिरातही त्यांनी मनोभावे दर्शन घेतले.
साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. यावेळी शिर्डीचे प्रसाद अय्यंगार हे समवेत होते.
0 Comments