प्रथम श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपात श्री ची प्रतिमा, ग्रंथ, विना, पूजन रामदास आगलावे यांनी सपत्नीक केले तसेच श्रीमती बेबीताई सोनवणे व सुनिता जपे यांच्या हस्ते तुलसी पूजन करून या सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी गावातील सर्व पदाधिकारी व पारायणार्थी उपस्थित होते. यावेळी सरपंच ओमेश जपे व बाळासाहेब जनार्दन जपे यांनी श्री साई पूजन करून पारायणार्थींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिजाबा आगलावे, शांताराम जपे, गणेश आगलावे, गणेश कापसे, राजेंद्र आगलावे, सुरेश जपे ,संभाजी जपे ,मनोज बिडवे,रवि कापसे, राजेंद्र जपे, राजकुमार गडकरी, प्रमोद कोपरे, सतीश जपे, राजेंद्र कापसे, रावसाहेब आगलावे, आनंद जपे, नाना जाधव, कैलास जपे, संतोष आगलावे, भैय्या जपे, आदींसह पदाधिकारी व पारायणार्थी, महिला भजनी मंडळ उपस्थित होते.पारायणाचे हे २२ वे वर्ष आहे. सुमारे 75 महिला व पुरुष साईभक्त या पारायणासाठी बसले आहेत. दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी सात ते 11 या दरम्यान श्री साई सच्चरित्र पारायण ह भ प सचिनभाऊ थोरात व सतीश जपे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. दुपारी गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री सात ते नऊ या कालावधीत कीर्तन होत आहेत. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे. शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी ह भ प अर्जुन महाराज चौधरी नांदुरखी, रविवारी दहा ऑगस्ट रोजी हभप संतोष महाराज टिकार आळंदी, सोमवार 11 ऑगस्ट रोजी ह भ प शिवानंद महाराज निपाणी पिंपळगाव, मंगळवारी सुरेश महाराज आढाव, बुधवारी ह भ प ऋषिकेश महाराज चव्हाण, गुरुवार रोजी भास्कर महाराज कोळी, शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी ह भ प बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे कीर्तन होणार असून शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी ग्रंथ मिरवणूक व त्यानंतर ह भ प प्रतीक्षा महाराज गिरमकर यांचे काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे .तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सावळीविहीर बु. ग्रामस्थ व भजनी मंडळ, यांनी केले आहे. या सोहळ्यानिमित्त येथील श्री हनुमान मंदिर व इतर मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
0 Comments