राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र सावळीविहीर बुद्रुक येथे नर्मदेश्वर सेवा धाम पिंपरी निर्मळ येथील महंत आत्माराम गिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाने शिवलीला अमृत ग्रंथ पारायण मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी सुरू होते. येथे त्यांनी भेट देऊन पारायणास व संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचा लाडका किर्तनकार म्हणून पुरस्कार मिळालेले ह.भ.प. हर्षल महाराज भागवत, आहिल्यानगर नाभिक सेना अध्यक्ष मनोज वाघ,व श्री संजय जाईबहार यांचा संत नाभिक सेना मंडळाच्या वतीने या सर्व मान्यवरांचा पारायण स्थळी शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ह भ प मनोज बिडवे महाराज,ह भ प राजू महाराज पवार,दीपक कदम, राजकुमार गडकरी, राजेंद्र जपे, चंद्रकांत जपे,योगेश पाचोरे, नाना कदम, किशोर अहिरे, सुनील कदम,कैलास सोनवणे, आदींसह संत नाभिक सेना मंडळाचे सदस्य, पारायणार्थी यावेळी उपस्थित होते.
0 Comments