त्रिमूती माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी साजरी.

टाकळीभान प्रतिनिधी-त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या घोगरगाव येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
 यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस आर जावळे प्रमुख वक्ते संभाजी गारुळे, नितीन साळवे, अर्चना जगताप हरिश्चंद्र डिके आदी मान्यवर उपस्थित होते.
 प्रमुख वक्ते संभाजी गारुळेम्हणाले की,आज आपण इथे भारताचे महान क्रांतिकारक, अटळ देशभक्त आणि असामान्य नेतृत्व गुण असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी स्मरणार्थ जमलो आहोत.
सुभाषबाबूंचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक, ओडिशा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यातील देशप्रेम, धाडस आणि आत्मविश्वास वेगळाच होता. इंग्रजांच्या अन्यायकारक राज्यव्यवस्थेविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी आपले सुख, नोकरी, परिवार सर्व काही बाजूला ठेवले.त्यांनी “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा” हा जो मंत्र दिला, त्याने हजारो युवकांमध्ये क्रांतीची ज्वाला पेटली. त्यांनी स्थापन केलेली आझाद हिंद फौज ही ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारी मोठी ताकद ठरली.सुभाषबाबूंच्या आयुष्याचा शेवट १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात झाला, असे अधिकृतरीत्या जरी सांगितले गेले तरी त्यांचा मृत्यू आजही एक गूढ मानला जातो. पण सत्य काहीही असो, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव आजही कायम आहे.
मित्रांनो, नेताजींचा संघर्ष, त्याग आणि देशप्रेम आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. खरा देशभक्त फक्त स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर राष्ट्रनिर्मितीसाठी देखील झटतो, हे त्यांनी दाखवून दिले.चला, आपण सर्वजण या पुण्यतिथीनिमित्त नेताजींना विनम्र अभिवादन करू आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याची शपथ घेऊ.जय हिंद.! यावेळी संदीप काळे, मनिष वेताळ, विकास कौटे, रेखा दिवे, अमोल बहिरट, ललिता गारुळे, कृष्णा शिंदे प्रियंका कोरडे,मयुरी राऊत, अश्विनी खुरुद,संकेत सावंत उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार हरिश्चंद्र डिके यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments