सोयगाव शहरात बैल पोळा ठिकाणी बैलाच्या धडकेत एक गंभीर जखमी, घरोघरी बैलांचे पूजन,वेशी पूजनाला महत्व--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.२२- सोयगाव शहरात शुक्रवारी बैल पोळा शांततेत साजरा करण्यात आला.  शहरातील जागृत हनुमान मंदिर समोर बैल पोळा साजरा केला जातो.याच ठिकाणी बैलाच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शहरातील भवानीनगर परिसरातील रहिवासी नितीन कृष्णा पाटील  वय ३५ वर्षे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.


 त्यास तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या डोक्याला मार लागला असल्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठवण्यात आले.दरम्यान गावाच्या वेशी पूजनाला महत्व देवून परंपरेनुसार शांततेत बैलपोळा साजरा करण्यात आला. महिलांकडून सर्जाराजाचे घरोघरी पूजन करून सर्जाराजास गोड घास भरविण्यात आले. पोळा सणानिमित्त सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनी पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments