अंजनाई गोशाळेत पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा--



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२२- क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा ता. सोयगाव संचलित अंजनाई गोशाळेत शुक्रवारी पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कोषाध्यक्षा उर्मिला इंगळे यांच्याहस्ते गोमाता व बैलांचे पूजन करून गोड नैवद्याचा घास भरविण्यात आला.


 दरम्यान बैलपोळ्याच्या निमित्ताने गोवंशाचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिप इंगळे यांनी  ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे,सचिव दिलीप शिंदे, संचालक अनिल लोखंडे,अशोक ढगे, ज्ञानेश्वर गाडेकर, संचालिका पद्मा शिंदे, रुपाली लोखंडे, मीना गाडेकर व गोशाळेचे कर्मचारी बापू ठाकरे, अनिताबाई ठाकरे, रवि ठाकरे, भागवत दणके आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments