सॉफ्टवेअर कंपनीच्या चुकीमुळे, मंजूर पदापेक्षा अधिक शिक्षक


    टाकळीभान (प्रतिनिधी) दिलीप लोखंडे 

-सॉफ्टवेअर कंपनीच्या दोषामुळे काही शाळेमध्ये मजूर पदक पेक्षा जास्त पद देण्यात आली आहे ,मजूर पद चार असताना तेथे पाच बदलून गेले आहे व आणि तेवढेच म्हणजे पाच पद भरली आहे, शिक्षक शाळेमावर गेल्यावरच एक पद अतिरिक्त होणार आहे ,तर या कंपनीकडून झालेल्या चुकीची दुरुस्ती होऊन तेथे शिक्षक अतिरिक्त होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना शिक्षण संघटनेने दिले आहे ,
    मागील महिन्यापासून प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. ग्राम विकास विभागाच्या आदेशाप्रमाणे बदली प्रक्रियेचे ऑनलाइन काम एका सॉफ्टवेअर कंपनीकडे कंत्राट दिले आहे. शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया राबविताना संचमान्यतेनुसार प्राथमिक शिक्षकाची शाळेतील पदे कमी झाली; परंतु सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना शाळा दाखविल्याने त्या ठिकाणी मान्य पदापेक्षा शिक्षकाचे पद अधिक झाले आहे. त्यामुळे शाळेत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत न्यायसंगत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

ग्रामविकास विभागाच्या आदेशाप्रमाणे बदली प्रक्रियेचे ऑनलाइन काम करण्यासाठी पुण्याच्या विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीकडे कंत्राट दिले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ नुसार घोषित केलेली विद्यार्थी प्रमाणात शिक्षक ही संचमान्यता वादग्रस्त
आहे. या संचमान्यतेनुसार शिक्षकांची पदे कमी होऊन त्याचा परिणाम गुणवत्तेवर होणार आहे. जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये सहायक शिक्षकाचे पद अधिक झाल्याने वेतनासह शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न निर्माण होणार आहे. अतिरिक्त शिक्षक ठरवताना कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी जून महिन्यापासून ऑगस्टपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या  रिक्त जागांवर समुपदेशनाद्वारे कायमस्वरूपी समायोजन करून न्यायसंगत निर्णय व्हावा, अशा मागणीचे विनंती निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सॉफ्टवेअर कंपनी दुरुस्त करण्याचे आदेश द्यावे अशी  मागणी प्राथमिक शिक्षक  संघटनेने केले आहे,

Post a Comment

0 Comments