सोयगाव पंचायत समिती कार्यालयासमोर रस्त्यात अस्तव्यस्त उभ्या वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांसह महिलांन करावी लागली तारे वरची कसरत, कारवाही करणार कोण?



दिलीप शिंदे
सोयगाव दि.२१ - सोयगाव येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर दि.२० बुधवारी शासकीय वाहनासह इतर दुचाकी वाहने भर रस्त्यात अस्तव्यस्त उभी असल्याने नागरिकांसह,महिला व शालेय विद्यार्थ्यांना ये -जा करतांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. रस्त्यात अस्तव्यस्त वाहने उभी करणाऱ्या वाहन धारकांवर कोण कारवाही करणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.
      याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोरून येण्या -जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याचा वापर शालेय विद्यार्थी,शासकीय कर्मचारी, वयोवृद्ध महिला,मजूर वर्ग नियमित वापर करीत असतात. दि.२० बुधवारी गटविकास अधिकारी दादाराव अहिरे हे पंचायत समिती कार्यालयात उपस्थित होते.त्यांना भेटण्यासाठी दुचाकी,चारचाकी वाहने घेऊन आलेल्या नागरिकांनी वाहतुकीच्या नियमाचे भान न ठेवता पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील भर रस्त्यात अस्तव्यस्त वाहने उभी केली होती.तब्बल दोन तास वाहने रस्त्यात उभी होती.

शेतातून काम करून घराकडे परतणाऱ्या महिला मजूर वर्ग, तहसील कार्यालयात निराधार पगाराची विचारपूस करण्यासाठी जाणारे वयोवृद्ध व चार वाजता शाळा सुटल्यानंतर घराकडे जाणाऱ्या पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधून वाट शोधत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. सुदैवाने विद्यार्थ्यांच्या धक्क्यामुळे दुचाकी पडून दुर्घटना घडली नाही.भर रस्त्यात वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकावर कारवाही करणार कोण असा प्रश्न उपस्थित नागरिकांकडून केला जात होता. गट विकास अधिकाऱ्याने या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी चर्चा पंचायत समिती परिसरात रंगली होती.

Post a Comment

0 Comments