सोयगाव पोलिसांचा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पिंक बॉक्स उपक्रम;-दहा शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन--



दिलीप शिंदे
सोयगाव दि३० -विद्यार्थ्यांमधील पोलिसांची भीती घालविण्यासाठी व विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरक्षित राहावे यासाठी दि.२९ मंगळवारी सोयगाव पोलिसांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन थेट विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून पिंक बॉक्स बद्दल माहिती दिली आहे.

 दरम्यान मंगळवारी उपनिरीक्षक गजानन आरेकर यांनी सोयगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसह दहा शाळांमध्ये या उपक्रमाची जनजागृती केली आहे पहिल्या टप्प्यात पिंक बॉक्स बद्दल माहिती देण्यात येवून आगामी आठवड्यात सोयगाव पोलिस प्रत्येक शाळेत पिंक बॉक्स बसविनार असल्याचे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी सांगितले दरम्यान या उपक्रमात पिंक बॉक्स मध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी तक्रार टाकून पोलीस प्रत्यक्ष हा बॉक्स उघडून आलेल्या तक्रारीचे निरसन करणार आहेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सुरक्षा म्हणून पोलिसांचे कवच मिळाले आहे दरम्यान मंगळवारी पासून तालुक्यातील प्रत्येक शाळेत या उपक्रमाची जनजागृती पोलिसांनी हाती घेतली आहे यामध्ये विद्यार्थी व पोलीस यांच्यात समन्वय राहून विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांची भीती दूर व्हावी व विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासासाठी पोलीस ठाण्यात येण्याची गरज भासू नये यासाठी पोलिसांनी हा पिंक बॉक्स उपक्रम हाती घेतला असल्याचे उपनिरीक्षक गजानन आरेकर यांनी सांगितले आहे दरम्यान मंगळवारी सोयगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपनिरीक्षक गजानन आरेकर, गजानन दांडगे,रवींद्र तायडे,सादिक तडवी आदींनी पुढाकार घेतला होता.

Post a Comment

0 Comments