आदिवासी मुलीचा विनयभंग करणाऱ्या जातीवाद्यांना अटक करा अन्यथा, पोलीस अधीक्षक कार्यावर भिल्ल समाजाचा आक्रोश मोर्चा-ज्ञानेश्वर अहिरे

राहुरी प्रतिनिधी 
आदिवासी भिल्ल समाजातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून मुलीला व तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करणाऱ्या जातीयवाद्यांना त्वरित अटक करा अन्यथा  पोलीस अधीक्षक कार्यालयावर भिल्ल समाजाचाआक्रोश मोर्चा काढून जाब विचारू असा खणखणीत इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे. 

    ‌‌ श्री. अहिरे यांनी म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाला मुस्लिम समाजाच्या जातिवादी लोकांनी बेदम मारहाण केली. तसेच आदिवासी अल्पवयीन मुलीचा विनय भंग करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपींन विरोधात गुन्हा जरूर दाखल केला असला तरी यामधील काही आरोपी मोकाट फिरत आहेत. या आरोपींकडून आदिवासी कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. तेव्हा या आरोपींना तात्काळ अटक करावी. कारण या जातीवादी आरोपींची गावांमध्ये अतिशय दहशत आहे. गावातील अनेक कुटुंबाला या जातीवादी लोकांनी त्रास दिलेला आहे. तसेच एकजूट करून यांनी आतापर्यंत संपूर्ण गावाला वेठीस धरले आहे त्यामुळे वेळोवेळी गावामध्ये या लोकांमुळे संघर्ष निर्माण झाला आहे. तरी पोलीस अधीक्षक साहेबांनी विशेष लक्ष घालून या आरोपींना त्वरित अटक करावी व गाव दहशतमुक्त करावे. तसेच आदिवासी कुटुंबालाच मारण करून त्यांच्यावरच खोटा नाटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घेण्यात यावा व आदिवासी कुटुंबाला न्याय द्यावा. सध्या हे आरोपी गावात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने जमाव करून फिरत आहेत. पोलिसांनी त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा पुन्हा आदिवासी कुटुंबावर जर हल्ला झाला तर यास पोलिसांनाच जबाबदार धरण्यात येईल. आणि जर पोलिसांकडून यांचा बंदोबस होत नसेल तर आदिवासी तरुणांना परवानगी द्या. आमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत. तरी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी त्वरित या जातीवादी आरोपींचा बंदोबस्त करून त्यांना अटक करावी व आदिवासी कुटुंबावर दाखल झालेला खोटा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा जिल्ह्यातील तमाम भिल्ल समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा धडकेल असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments