निर्भिड, व डॅशिंग पत्रकार किरणताई जाधव उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित



शिर्डी ..राजेंद्र दुनबळे..

अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन लघुउद्योग विकास संघटना पुरस्कार सोहळा नुकताच शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.प्रदीप पा. खंडापूरकर बाबा यांच्या उपस्थित पार पडला.


यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती वतीने सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र व शाल पुष्पगुच्छ देत सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी शिर्डी येथील नावाजलेले यू ट्यूब JD महाराष्ट्र NEWS चॅनलच्या संचालिका किरणताई जाधव यांना उत्कृष्ट पत्रकार २०२५-२६ पुरस्कार श्री.प्रदीप पा. खंडापूरकर बाबा, अँड.राणीताई स्वामी, सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन सौ.नयनाताई शिरसाठ, मनोज दुशिंग,रमेश साबळे, बाळासाहेब शिरसाठ, सायली बनसोडे, रुपाली मोलाचे, सुरेंद्र महाले, पंकज पाटील, बाबासाहेब पगारे, सौ.मायाताई आरणे यांनी केले होते.

अन्यायाला वाचा फोडून .सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या प्रसार माध्यमातून  सातत्याने करणाऱ्या .कमी वेळात राहता तालुक्यातच नवे तर अहिल्यानगर जिल्ह्यातही आपल्या कामाची ठसा त्यांनी उमटवला अशा
किरणताई जाधव यांना पुरस्कार मिळाल्याने. शिर्डी. राहातातालुका.पंचक्रोशीत गावातील
सर्व स्तरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments