दिलीप शिंदे
सोयगाव दि.३० - सोयगाव -बनोटी रस्त्यावरील नांदगाव तांडा ते घोसला दरम्यान उद बिल्ला हा प्राणी रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळल्याची घटना दि.३० बुधवारी सकाळी दहा सव्वा दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान सायंकाळी साडे चार पावणे पाच वाजेचा दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत उद बिल्ला ताब्यात घेतला होता.
सोयगाव वनविभागाचा हलगर्जीपणा समोर आल्याने प्राणी प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी, राज्य महामार्ग असलेल्या सोयगाव - चाळीसगाव रस्त्यावरील घोसला - नांदगाव तांडा दरम्यान रस्त्याच्या कडेला एक उद बिल्ला दि.३० बुधवारी सकाळी दहा सव्वा दहा वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळला होता. याबाबत वन्यजीव संवर्धक व अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.संतोष पाटील यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती देण्यात आली. याची तत्काळ दखल घेत डॉ. पाटील यांनी सोयगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिसाळ यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डॉ.पाटील यांनी सुवर्णा माने उप वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर यांना या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. झोपेत असलेला सोयगाव वनविभाग खडबडून जागे होत मृत उद बिल्ला या प्राण्याचा शोध सुरू केला. सायंकाळी साडे चार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास सोयगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत उद बिल्ला चे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळते. उद बिल्ला चा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेने झाला की घातपात ! ही बाब शवविच्छेदना नंतर स्पष्ट होणार आहे.मात्र मृत अवस्थेत असलेल्या उद बिल्ला यास तत्काळ उपचार मिळाले असते तर त्याचे प्राण वाजले असते अशी चर्चा वन्य प्रेमी मध्ये सुरू होती. वनविभागाच्या हलगर्जीपणाने कळस गाठल्याने वनविभागा गलथान कारभाराविषयी वन्य प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रतिक्रिया -- एसीयन सीवेट -उद मांजर / पान मांजर / उद बिल्ला / म्हसणं उद असे अनेक नावे असलेला हा जैवविविधतेचा महत्वाचा घटक अनेक गैरसमजाचा बळी ठरला आहे. हा प्राणी निशाचर असून तो आपल्या भक्षा च्या शोधात सकाळी चार ते दिवस उजडे पर्यंत भटकंती करत असतो. उंदीर, साप, बेडूक, लहान कीटक हे याचे भक्ष असून तो कृषी व्यवस्थेस मदत करतो शिवाय तो विविध झाडांचे फळं खाऊन नैसर्गिक बीज प्रसार ही करतो.यातून निसर्गात झाडे वाढीस लागतात. हा प्राणी स्मशानात प्रेत उकरून खातो हा मोठा गैरसमज याबाबत आहे. याच्या केस, नखं ई अवयव भानामती साठी वापरतात व यासाठी याची हत्या होते. हा ही गैरसमज व अंधश्रद्धा आहे. या वन्यजीवाचा रस्ते अपघातात बळी जाणे शोकांतिका आहे. राम प्रहरी वाहने चालवताना वनक्षेत्र परिसरात वेग हळू ठेवावा .
डॉ. संतोष पाटील, पर्यावरण संवर्धक, सोयगाव- सिल्लोड
0 Comments