राजकुमार गडकरी
या श्री साईसतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहा निमित्ताने शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान नांदुरखी येथील ह भ प अर्जुन महाराज चौधरी यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे तर रविवार 10 ऑगस्ट 2025 रोजी आळंदी येथील ह भ प संतोष महाराज टिकार, तसेच सोमवार 11 ऑगस्ट 2025 रोजी पिंपळगाव निपाणी येथील ह भ प शिवानंद महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तर मंगळवार 12 ऑगस्ट रोजी कन्नड येथील ह भ प सुरेश महाराज आढाव तर बुधवार 13 ऑगस्ट रोजी ठाणगाव येथील ऋषिकेश महाराज चव्हाण यांचे किर्तन होणार आहे. तसेच गुरुवार 14 ऑगस्ट 2025 रोजी ह भ प भास्कर महाराज कोळी राहुरी तर शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 9 ते 12 यादरम्यान गोकुळाष्टमीनिमित्त ह भ प बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. तर शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजता ग्रंथ मिरवणूक निघणार असून त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा हभप प्रतीक्षा महाराज गिरमकर यांचे गोपाळकाला निमित्त काल्याचे किर्तन होणार आहे. या कार्यक्रमात श्री साईसतचरित्र पारायण व्यासपीठ चालक ह भ प सचिनभाऊ थोरात हे असणार आहेत. पारायण व्यवस्था श्री साई सेवा संघ ,सावळविहीर बुद्रुक,व परिसरातील भजनी मंडळ आदि राहणार असून मृदंगाचार्य संदीप महाराज वैद्य, तर गायनाचार्य रावसाहेब महाराज वेताळ व किरण महाराज हारळे हे राहणार आहेत. साऊंड सिस्टिम प्रवीण महाराज कुदळे यांची असणार आहे . श्री साई सतचरित्र पारायण व किर्तन हे सर्व धार्मिक कार्यक्रम श्री हनुमान मंदिर सभा मंडप, सावळीविहीर बुद्रुक तालुका राहता येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी पारायणास बसावे,व किर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळ सावळविहिर बुद्रुक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments