श्रावणात नवपंथीय नऊभक्तांची,नऊ दिवसाची, नवनाथ यात्रा! या यात्रेचे सावळीविहीरला स्वागत!


राजकुमार गडकरी शिर्डी 

शिर्डी ( प्रतिनिधी) अध्यात्मिक दृष्टीने श्रद्धा व भक्तीला  मोठे महत्व आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने आपली श्रद्धा भक्ती ठेवून परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो . अशीच जगाच्या कल्याणासाठी नवनाथांवर मोठी श्रद्धा ठेवून नऊ जण, नऊ दिवसाची नवनाथ यात्रा काढत एक आगळीवेगळी भक्ती रुपी नवनाथ सेवा करत आहेत. श्रीक्षेत्र  तालुका कळवण येथून श्री क्षेत्र मढी अशी पायी ही नवनाथ यात्रा श्रीक्षेत्र‌ चेचर येथून दिनांक 24 जुलै 2025 रोजी निघून नऊ दिवसात  हे नऊ नवनाथभक्त  ती श्रीक्षेत्र मढीला ला जाऊन ते पूर्ण करणार आहेत. 


श्रीक्षेत्र मढीला  जाताना त्यांचे सावळीविहीर बुद्रुक येथे आगमन होताच मंदिरामध्ये पत्रकार राजकुमार गडकरी बाबासाहेब जपे, गोकुळ जपे, यांच्यासह ग्रामस्थांकडून  त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अंगात भगवी कफणी व कुर्ता, डोक्याला भगवा फेटा, हातात कमांडलू ,गळ्यात रुद्राक्षांच्या माळा अशा पेहराव्यात हे भक्तगण नवनाथभक्त गुरुवर्य गणपत महाराज पवार- चाचेरकर , यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र मढी कडे जात असताना मंगळवार 29 जुलै रोजी सावळीविहीर येथे गावातील मंदिरामध्ये आले. तिथे सर्व मंदिरात दर्शन घेऊन श्री गुरुदेव दत्ताचे दर्शन घेत पूजन अलख निरंजन !चा जय जय कार केला, मोठ्या भक्तीने व शिस्तबद्ध आणि नम्रतेने हे नवनाथ भक्त आपल्या गुरुवर्य गणपत महाराज पवार चाचेरकर यांचे दर्शन घेऊन त्यांनी येथे पूजा पाठ केला. त्यानंतर या नवनाथ यात्रे संदर्भात बोलताना, आम्ही सर्व नवनाथपंथी असून  या  जग कल्याणासाठी  ही  पायी नवनाथ यात्रा श्रावणात करत आहे. रस्त्याने जाताना गावागावातील सर्व तीर्थक्षेत्र व मंदिराचे दर्शन घेत जात असल्याचे यावेळी त्यांच्यासमवेत असणारे अशोक उगले महाराज यांनी सांगितले.व पुढील श्रावणातही आम्ही अशीच ही नवनाथ यात्रा करणार आहोत असे या वेळी ते  म्हणाले. यावेळी या नवभक्तांची गुरुवर्य नवनाथ महाराज पवार चाचेरकर  यांच्या समवेत  संदीप पवार, कुंदन वाघ ,संदीप सोनवणे, अनिल पवार ,संजय चव्हाण, देवा माळी, पिनू बागुल ,अनिल मोरे आदी नवनाथभक्त होते. येथे सावळीविहीर मंदिरात देवदर्शन झाल्यानंतर सावळीविहीर येथून ते शिर्डीत दर्शन घेऊन  नंतर शनिशिंगणापूरकडे पायी रवाना झाले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत होते.

Post a Comment

0 Comments