राजकुमार गडकरी
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र रुई येथे 132 वा अखंड हरिनाम सप्ताह सध्या सुरू असून येथे कीर्तन महोत्सवात दुसरे पुष्पगुफंताना ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी, संत नामदेव महाराजांच्या- धन्य महाराज जन्मले संसारी! जे ध्याती अंतरी नारायण!! नारायण गाय नारायण धाय !धन्य त्याची माय प्रसवली!! प्रसवली तया कुळाचा उद्धार !तो तरे निर्धार नामा म्हणे!! या अभंग चरणावर अनेक दाखले देत कीर्तनात निरूपण करताना पुढे म्हटले की, श्री क्षेत्र रुई हे संतांच्या परिसरात असणारे पवित्र क्षेत्र आहे. संपूर्ण जगाला सबका मालिक चा संदेश देणारे साईबाबा ,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, श्री जंगली महाराज, श्री चांगदेव महाराज, श्री उपासनी महाराज त्याचप्रमाणे सद्गुरु परम पूज्य गंगागिरीजी महाराज यांचा हा परिसर आहे. या भूमीला संतांच्या विचाराचा वारसा मिळाला आहे. अशा या श्रीक्षेत्र रुई गावात सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी 132 वर्षांपूर्वी परंपरा घालून दिलेला परंपरेनुसार हा अखंड हरिनाम सप्ताह सुमारे पाच ते सहा पिढ्यांपासून येथे सुरू आहे. त्यामुळे या अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे. येथील श्री हनुमान मंदिरासमोर सप्ताह सुरू असून श्री हनुमान व रुई यांच्यात अतूट नाते आहे. श्री हनुमानाला रुई ची फुले अतिशय प्रिय आहेत. त्या संदर्भात सांगताना महाराज पुढे म्हणाले की, एका अप्सरेने श्री.हनुमान जिला पती म्हणून स्वीकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हनुमानजी ने आपण ब्रह्मचारी असून आपण आजन्म चिरंजीव व अमर आहोत .मात्र तुझी श्रद्धा मोठी आहे. भक्ती मोठी आहे. मात्र आपण तुला पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही. पण तू वनस्पती अवतारात आली. रुईच्या रूपात आली तर रुई मला प्रिय असून मला रुईचे फुल अर्पण करण्यात येईल व तीच तुझी श्रद्धा भक्ती त्यातून कायम राहील. असे सांगत श्री हनुमान व रुईचे कसे महत्त्व आहे हे त्यांनी यावेळी पटवून देत श्रीक्षेत्र रुई गावानेही 132 वा अखंड हरिनाम सप्ताह करून ही परंपरा सुरू ठेवली आहे. त्यामुळे येथे एक आगळावेगळा असा सप्ताह होऊन समानतेचा संदेश सर्वत्र दिला जात आहे. किर्तन एक मोठी अध्यात्मिक ज्ञान देणारी शक्ती आहे. व येथील किर्तन महोत्सवातून ती निर्माण होत आहे.येथिल सप्ताह एक दिशा देणारं दीपस्तंभ ठरत आहे. असं सांगत सध्या या कालावधीत राज्यात ठिकठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू आहे. संत बहिणाबाई ,संत गगनगिरी, सद्गुरु गंगागिरी महाराज आदी नावाने ठिकठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू आहेत.सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी या हरिनाम सप्ताह रुपी वटवृक्षाचे बीजारोपण केले. त्यास सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनी गावागावात ते नेले.व आज हा अखंड हरिनाम सप्ताहाचा वेलू राज्यभर पसरला आहे. अखंड हरिनाम सप्ताहातून नामस्मरण होते. नामात मंत्र तंत्र आहे. नामात मोठी शक्ती आहे. मात्र नामस्मरण किंवा नाम जप करताना जीवनात नित्यनेम पाहिजे. आज संत तुलसीदास जयंती आहे. त्याचप्रमाणे कलंकी जयंती आहे. हा पर्वकाळ आज आहे. अशा या पर्व काळात कीर्तन सेवा होत आहे. व या सेवेतून नामस्मरण होत आहे. किर्तन रुपी नामस्मरणातूनच संत दासगणूनी श्री साईबाबांचे चरित्र मांडले. श्री साईबाबांनी सबका मालिक एक व श्रद्धा आणि सबुरीचा संपूर्ण विश्वाला संदेश दिला.प्रथम कीर्तनाची गादी सुरू करणारे नारद मुनी यांनी नारायण नारायण नामस्मरण करत या जग चालकाची महती सर्वदूर जनमाणसात पसरवली. त्याचप्रमाणे शेगावचे संत गजानन महाराजांनी गण गणात बोते तर स्वामी समर्थांनी भिऊ नको, मी आपल्या पाठीशी आहे. असा उपदेश केला. तर सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी लेने को हरिनाम! देने को अन्नदान!! तरणे को लिनता! डुबने को अभिमान!! हा मंत्र दिला. असा हा संदेश सर्वांसाठी आध्यात्मिक आरसा देणारा आहे. जसा आरसा असला तर त्यात मुख पाहता येते. तसं या संदेशातून भक्ती व या भक्तीतूनच परमेश्वराला पाहता येते. असे ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी यावेळी कीर्तनातून निरूपण करताना सांगितले. कीर्तनानंतर सप्ताह कमिटी व समस्त रुई ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचा शाल, पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. कीर्तनाला मोठ्या संख्येने भाविक, श्रोते उपस्थित होते.
0 Comments