युवा पत्रकार शंकर सोनवणे यांचा लोणी बस आगाराच्या वतीने सत्कार

लोणी (प्रतिनिधी)

लोणी (ता. राहाता) – पत्रकारितेत प्रामाणिक आणि निर्भीड कार्य करत असलेल्या युवा पत्रकार शंकर सोनवणे यांचा लोणी बस आगाराच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ आणि जेष्ठ नेते श्री. रंगनाथ (अण्णा) विखे पाटील यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये बस आगार डेपोचे अधिकारी आर. एन. पर्वत, छत्रपती डेअरीचे चेअरमन रवींद्र मुखेकर, वाहतूक नियंत्रक नंदकिशोर कानकाटे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर साबळे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमात बोलताना श्री. राजेंद्र मते यांनी सांगितले की, "शंकर सोनवणे हे अत्यंत प्रामाणिक, निर्भीड आणि सामाजिक भान असलेले पत्रकार आहेत. पत्रकारितेला शोभेल असे काम ते सातत्याने आपल्या लेखनातून करतात. त्यांच्या बातम्यांमधून समाजाला दिशा मिळते."

आर. एन. पर्वत साहेब यांनीही सोनवणे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले, "लोणी बस आगारच्या विविध उपक्रमांमध्ये सोनवणे यांची नेहमीच उपस्थिती आणि सहकार्य लाभते. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे."

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी पत्रकार सोनवणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा सोहळा उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला.

Post a Comment

0 Comments