श्रीरामपुर (वार्ताहर)
श्रीरामपूर तालुक्यातील खासदार गोविंदरावजी आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरसगांव व महाविद्यालयाच्या ३४ वर्षे सेवेतून सेवा मुक्त झालेल्या शिक्षिका उषा मच्छिंद्र जगताप यांना महाविद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्राचार्य सुभाष काळे व सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांच्या वतीने मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .प्राचार्य काळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले उषा मच्छिंद्र जगताप व मच्छिंद्र रघुनाथ जगताप या दोघांचे या शाळेत शिक्षक पदावर कार्य केले आहे.व शाळा उभारणीच्या वेळेस मोलाचे योगदान दिले.
व दोन पिढ्या विद्यार्थी घडविले असे त्यांच्या सांगितली उषा मच्छिंद्र जगताप माजी मुख्याध्यापक मच्छिंद्र रघुनाथ जगताप .राहुल जगताप. आशा दांगट आदींनी मनोगत व्यक्त केले जगताप कुटुंबाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आली सूत्रसंचालन करून प्रकाश बागुल यांनी आभार मानले.
0 Comments