ख. वि.संघ निवडणूक; आमदार अब्दुल सत्तारांचे वर्चस्व, 17 पैकी 13 जागा जिंकल्या,कार्यकर्त्यांचा जल्लोष



दिलीप शिंदे सोयगाव 
सोयगाव  दि.30, सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाची मतमोजणी  सोमवारी ( दि.30) पार पडली. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट , शिवसेना उबाठा गट यांच्या विरुद्ध भाजप, काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत झाली. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, उबाठा गटाच्या पॅनलने 17 पैकी 13 जागेवर विजय मिळवला.

    सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड (उबाठा) यांच्या शेतकरी सहकार विकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत 17 पैकी 13 उमेदवार विजयी झाल्याने आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलला या निवडणुकीत पराभवाला समोरे जावे लागले. भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचे  केवळ ४ उमेदवार विजयी झाले.  दरम्यान निकालाची घोषणा होताच आमदार अब्दुल सत्तार यांचे  येथील जनसंपर्क कार्यालया समोर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 
-----------
आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम
     विधानसभा निवडणुकीनंतर सोयगाव तालुक्यात खरेदी विक्री संघाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणूक पार पडली.  भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी सभा घेवून या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. मात्र सभासदांनी त्यांना नाकारले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सभासदांनी शेतकरी सहकार विकास पॅनलला मतदान करून विजयी केले. या निमित्ताने सहकार क्षेत्रावर आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले.
-----------
खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत पक्ष भेद बाजूला सारून केवळ सहकार क्षेत्राच्या हितासाठी शिवसेना ( शिंदे गट ) आणि शिवसेना ( उबाठा ) यांनी एकत्र येऊन शेतकरी सहकार विकास पॅनलने निवडणूक लढवली. या पॅनलच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार तसेच शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड व दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या भेटी घेत शेतकरी सहकार विकास पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले होते.
---------
या निवडणुकीत सोयगाव तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत एकूण 2 हजार 425 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एक जागा बिनविरोध झाल्याने एकूण १६ जागेसाठी निवडणूक झाली. यातील सहकारी संस्था मतदार संघातून शिवसेना ( शिंदे गट ) चे  भगवान कौतिक लहाने रा. तितुर यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे एकूण 16  जागांसाठी सोमवारी  मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.
-------------
या निवडणुकीतील शेतकरी सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार 
1 ) प्रभाकर दयाळराव काळे - सहकारी संस्था
2 ) संजय काशिनाथ निकम ( वैयक्तिक मतदारसंघ बनोटी )
3 ) सुभाष अजबराव बोरसे ( वैयक्तिक मतदारसंघ बनोटी )
4 ) संजय काशिनाथ निकम ( वैयक्तिक मतदारसंघ बनोटी )
5 ) लहाने भगवान कौतीक ( बिनविरोध - सह.संस्था )
6 ) राधेश्याम जगन्नाथ जाधव ( वैयक्तिक मतदारसंघ फर्दापूर )
7 ) रंगनाथ रामदास वराडे ( वैयक्तिक मतदारसंघ फर्दापूर )
8 ) गुलाबसिंग देवसिंग पवार ( सहकारी संस्था मतदार संघ फर्दापूर )
9 ) चंदाबाई शिवदास राजपूत ( महिला राखीव मतदार संघ )
10 ) प्रतिभा धरमसिंग सोळंके ( महिला राखीव मतदारसंघ )
11 ) भारत बाबुराव तायडे ( अनुसूचित जाती / जमाती मतदारसंघ ) 
12 ) मोतीराम नारायण तेली (इतर मागासवर्गीय मतदारसंघ )
13 ) राजेंद्र पेलाद राठोड ( विमुक्त जाती/भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ
--- 
      आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने विजय मिळवतात त्यांच्या सोयगाव येथील जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा विजयी उमेदवार  प्रभाकर आबा काळे, त्यासोबतच शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख तथा विजयी उमेदवार राजेंद्र राठोड यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण,  शिवसेनेचे गट नेते अक्षय काळे, स्वप्नील पाटील , सलीम खा पठाण, विक्रम चौधरी, शिवदास राजपूत, हर्षल काळे, कुणाल राजपूत,  किशोर मापारी, राजू दुतोंडे , शिवाप्पा चोपडे, किशोर अग्रवाल, दुर्गाबाई पवार ,विठ्ठल सपकाळ, विजय खाजेकर, शेख सलीम हुसेन , हनिफ मुलतानी, लतीफ शहा, गणेश खैरे ,स्वानंद पाटील,  प्रकाश पाटील, मेघराज राठोड , आत्माराम पवार, रमेश चौधरी, अविनाश पाटील, रमेश गवंडे ,नारायण घनगाव, शेख रउफ,भगवान वाघ , रामदास राजपूत ,अरुण वाघ, फिरोज पठाण, शेख जाकीर, बंडू काळे, विलास वराडे, बद्री चव्हाण, प्रवीण कदम , प्रदीप कदम, गोरख राजपूत ,सुनील पाटील आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments