श्रीक्षेत्र रुई येथे हरिनाम सप्ताह निमित्त गुरुवार 31 जुलै रोजी रात्री नऊ ते 11 यावेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख , इंदोरीकर यांचे किर्तन!

राजकुमार गडकरी शिर्डी 

शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील रुई येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी 132 वा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात सुरू झाला असून त्यानिमित्ताने कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तन महोत्सवात तिसरे किर्तनपुष्प 31 जुलै 2025  रोजी रात्री नऊ ते 11 या दरम्यान राष्ट्रीय प्रबोधनकार व प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहीर हरी किर्तन या सप्ताह सोहळ्यानिमित्त होणार आहे.

 येथील श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह भ प निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर हे प्रसिद्ध कीर्तनकार असून   संपूर्ण महाराष्ट्रात विनोदी व प्रबोधनकार असे प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून परिचित आहेत. त्यांचे सुश्राव्य असे‌ किर्तन गुरुवार 31 जुलै 2025 रोजी रात्री नऊ ते 11 या दरम्यान  श्रीक्षेत्र रुई येथे होत आहे. या कीर्तनाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे आवाहन सप्ताह कमिटी व समस्त रुई ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments