सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी सावळीविहीर बुद्रुक इथून गुरुवारी रिक्षातून महाप्रसादासाठी भाकरी मोठ्या भक्ती भावात रवाना!

शिर्डी (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताह शनिदेव गाव व सप्तकृषी मध्ये सध्या मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमात सुरू असून येथे दररोज आमटी भाकरीचा महाप्रसाद भाविकांसाठी होत आहे. दररोज शनिदेवगाव व सप्त कृषीच्या हरिनाम सप्ताह च्या स्थळी हजारो भाविक भेट देऊन दर्शन प्रवचन व कीर्तनाचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे भाकरी आमटीचा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. या भाकरी आमटी महाप्रसादासाठी वेगवेगळ्या गावावरून वाजत गाजत, भजन म्हणत, हरी नामाचा जयजयकार करत टेम्पो ,रिक्षात भाकरी आणण्यात येत आहेत.

 राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथूनही योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह साठी शनिदेवगाव व सप्त कृषी सप्ताह स्थळी गुरुवारी 31 जुलै 2025 रोजी सकाळी गावातून  श्री हनुमान मंदिरात भाकरी जमा करून एका रिक्षामध्ये मोठ्या धार्मिक वातावरणात भजन गात महिला भजनी मंडळींनी शनी देवगाव या अखंड हरिनाम सप्ताह स्थळी  हभप रामदास पाटील आगलावे,  पद्मताई कापसे,  नानी दहिवाळ, कामठे मावशी, आदीं भजनी मंडळींनी पोहच केल्या. त्यांना रस्त्यापर्यंत  बेबीताई सोनवणे, पोलीस पाटील सुरेश वाघमारे, सुनील रामदास आगलावे, पत्रकार राजकुमार गडकरी, बाळासाहेब सदाफळ, भैय्या जपे, संजय जपे, आदीसह ग्रामस्थ भाविक यांनी नगर मनमाड रस्त्यापर्यंत पायी या रिक्षा बरोबर भजन गात सप्ताहस्थळा कडे रवाना केले.

Post a Comment

0 Comments