शासनाने प्रतिबंधित केलेले मांगुर जातीचे मासे राहाता पोलिसांच्या जाळ्यात! चार जणांवर गुन्हा दाखल!

शिर्डी ( प्रतिनिधी) राहता येथे पोलिसांनी सुमारे चार लाख साठ हजार रुपये किमतीचे शासनाने प्रतिबंधित केलेले मांगुर जातीचे मासे घेऊन जाणारा ट्रक पकडून चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  दिनांक 05/06/2025 रोजीचे 23/00 वा. ते दिनांक 06/06/2025 रोजीचे सकाळी 06/00 वाजेदरम्यान मा. पोलीस अधिक्षक सोमनाथ गार्गे सो. मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे सो. श्रीरामपुर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने सो. शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईद अनुषंगाने अवैध गोवंश वाहतुक कारवाई अनुषंगाने राहाता पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण सांळुखे, सफौ प्रभाकर शिरसाठ, पोहेका विशाल पंडोरे, पोका अनिल गवांदे, पोना विनोद गंभीरे व चालक पोहेकाँ शेषराव अनारसे असे चितळी चौक येथे नाकाबंदी करीत असतांना एक पांढरे रंगाचा अशोक लिलैंड कंपनीचा ट्रक क्रमांक RJ25 GA6958 असा अहिल्यानगर कडुन शिर्डी च्यादिशेने संशयीतरित्या दिसुन आल्याने त्यास चितळी चौक येथे थांबवून खात्री केली असता त्यात देशात प्रतिबंधीत असलेले मांगुर जातीतील  प्रकरातील मासेंनी भरलेला ट्रक मिळून आल्याने ट्रक चालक यांस त्याबाबत विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदर मासेंबाबत खात्री करणेकरीता सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर अहिल्यानगर यांना बोलावुन घेवुन त्यांचे मार्फत  खात्री केली असता सदर ट्रक मध्ये सुमारे 460,000/- रुपये किं.चे सुमारे 4600/- किलो वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगुर जातीचे  प्रकरातील मासे मिळुन आल्याने पंचनामा करुन सदरचा पर्यावरणाला धोका निर्माण करुन तसेच लोकांनी खाल्यास मोठ्या स्वरुपात गंभीर आजार व दुखापत होण्याची जाणीव असतांना यातील आरोपी नामे 1) सादाब हकिम खान वय 25 वर्षे रा. पुनसवास वार्ड क्रमांक 14 नेताजी धरमपुरी ता. धरमपुरी जि. धार राज्य मध्यप्रदेश 2) मांगीलाल नाथुलाल कहार वय 35 वर्षे रा. राजगड ता. सरदारपुर जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश 3) नरसिंहा मुंग्रा रा. भिगवण जिल्हा पुणे व 4) कमल चौहान रा राजगड जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश यांनी ते ट्रकमधून चालवले होते त्यामुळे त्यांच्या विरुध्द गुन्हा रजि. क्रमांक 246/2025 भारतीय न्याय संहिता कलम 223,275 सह अन्न सुरक्षा व मानके अधिनीयम 2006 चे कलम 58 व 59 व पर्यावरण (संरक्षण) अधिनीयम 1986 चे कलम 3,5,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री सोमनाथ गार्गे सो., मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबमें सो. श्रीरामपुर परिमंडळ व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने सो. शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण सांळुखे, सफौ प्रभाकर शिरसाठ, पोहेकाँ/  विशाल पंडोरे, पोकाँ अनिल गवांदे, पोना विनोद गंभीरे व चापोहेकाँ  शेषराव अनारसे अशांनी सदरची कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments