दिलीप शिंदे
सोयगाव दि.06 सोयगाव तालुका शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, पक्षांचे आमखेडा जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुख पदी सुर्यभान कडूबा गवळी पाटील याची नियुक्ती करण्यात आली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते सूर्यभान गवळी यांना नियुक्ती पञ देण्यात आले.
यावेळी शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख दिलीप मचे यांची उपस्थिती होती. सूर्यभान गवळी पाटील यांची शिवसेना (उबाठा) आमखेडा जि.प. गटाच्या उप तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना (उबाठा) तालुका संघटक गुलाबराव कोलते,विलास राठोड, धोंडू बावस्कर, शहरप्रमुख रवींद्र काटोले, उपशहर प्रमुख दीपक बागुल, मोतीलाल घुसिंगे आदींसह शिवसेना,युवासेना, महिला आघाडी व कट्टर शिवसैनिकांनी अभिनंदन करीत नवनिर्वाचित उप तालुकाप्रमुख सूर्यभान गवळी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments