दिलीप शिंदे
सोयगाव दि.06- आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला दैवी असा सुवर्ण पिंपळ नावाचा देववृक्ष आहे ,तो भारत भूमीवरील 2500 वर्ष वयाहुन अधिक व सर्वात प्राचीन वृक्ष असून सदर वृक्ष धनाची देवता कुबेराने लावला आहे असा संदर्भ स्कंद पुराणात आहे अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,आळंदी देवाची यांनी उपलब्ध करून दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई माता रुख्मिनी यांनी या वृक्षास सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या आहेत.या देववृक्षाच्या फळांचे बीज संकलन करून सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे पर्यावरण संवर्धक डॉ.संतोष पाटील यांनी रोपे बनवून आज नील्लोड फाटा येथील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने हभप रामेश्वर महाराज पवार, शिक्षक कृष्णा जैवळ ई. हस्ते दोन ठिकाणी रोपण करण्यात आले. या वृक्षावर अनेक पक्षांचा अधिवास असतो.
0 Comments