युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम तर्फे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वृक्षारोपण


दिलीप लोखंडे 
टाकळीभान प्रतिनिधी - युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम ही सामाजिक संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहे. दर वर्षी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम तर्फे जागतिक पर्यावरण दिना निमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयॊजन केले जाते.त्या अनुषंगाने ५ जून २०२५  रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजीत केले होते. 
     सध्या आपण पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, तापमानात वाढ, दुर्मिळ वनस्पतीचा ऱ्हास आदि समस्यांना सामोरे जात आहोत. आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन आपण या समस्ये विरोधात लढले पाहिजे.यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्रीच्या कुशी मध्ये कळसुबाई च्या पायथ्याशी अहिल्यानगर जिल्ह्यातील उदडवणे येथे संस्थे तर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.     
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आयआरएस  अधिकारी  प्रितेश बावीस्कर, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत ७४६ क्रमांकाने उत्तीर्ण झालेले  श्रीतेश पटेल , प्रसिद्ध हदयरोग तज्ञ डॉ चंद्रकात चव्हाण आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे डॉ विक्रम गायकवाड, डॉ समीर ननावरे ,डॉ कल्पेश वाणी,डॉ सोनल भालेराव , हेल्थ केअर मार्केटिंग असोसियशनचे श्री श्रीकांत माने ,  सिद्धू चव्हाण व त्यांचे सहकारी तसेच निसर्गप्रेमी मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या पूर्व संध्येला ४ तारखेला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयआरएस अधिकारी श्री श्री प्रितेश  बावीस्कर यांनी यशस्वीतेचे मूलमंत्र सांगितले तसेच श्रीतेश पटेल यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी व स्पर्धा परीक्षेची तयारी याबाबत माहिती सांगितले डॉ चंद्रकांत चव्हाण आरोग्य विषयी  माहिती दिली.  .       
       युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम तर्फे युपीएससी व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांसाठी मोफत मार्गदर्शन व शिष्यवृत्ती दिली जाते. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात वृक्षारोपण ,मोफत आरोग्य शिबीर आदि उपक्रम संस्थे मार्फत केले जातात या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी केले. या वर्षी संस्थेतील १४ विद्यार्थी UPSC, ५ विद्यार्थी CAPF , ९ विद्यार्थी MPSC व २ विद्यार्थी PSI झाले आहेत. यातील श्री प्रितेश बावीस्कर व श्री श्रीतेश पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments