आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ताचा जथा निर्माण करणार चरणदादा त्रिभुवन

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ताचा जथा निर्माण करणार चरणदादा त्रिभुवन

 श्रीरामपूर, नंदकुमार बगाडे 
 व्हीआयपी गेस्ट हाऊस श्रीरामपूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस ग्रामीण व शहर भागातील असंख्य महिला पुरुष व तरुण कार्यकर्त्यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
 त्यावेळेस नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन म्हणाले की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केलाआहे या देशातील रंजल्याला गांजलेला दीन दलीत अठरा पगड जाती अलुतेदार बलुतेदार, पिढ्या ना पिढ्या सत्तेपासून वंचित राहिलेला वंचित समूहाला सत्तेमध्ये सामील करण्या साठी वंचिताचा समूह तयार करून प्रस्थापितांना शह देऊन सत्ता काबीज करण्यासाठी वंचित हा राजकीय पक्ष तयार केला आहे,या पक्षामध्ये तुमच्यासारख्या सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केल्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीमध्ये वंचित समूह कार्यकर्त्यांचा जथा निर्माण करून वंचित बहुजन आघाडी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्व निवडणुका ताकतीने लढूया त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागा असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन म्हणाले, त्यावेळेस रेव रेंट पास्टर  रावसाहेब त्रिभुवन प्रवीण भाऊ साळवे शिवा भाऊ साठे नवनाथजी गुडेकर श्रीकांत बनसोडे बाबाभाई शेख वसंतराव साळवे राजेंद्र गायकवाड दर्शनाताई काळे साक्षीताई गुडेकर संगीता ताई गायकवाड वर्षाताई रूपटक्के आदींनी मनोगत व्यक्त केले  त्यावेळेस आकाश सरोदे सौरभ हजारे शेखर साळवे शुभम लोखंडे शुभम जोगी वेधार्थ काळे सागर सरोदे नदीम शेख परवेज शेख बबलू शेख तोफिक शेख सोनू शेख 
 हूजेब शेख जैयत शेख तसेच रीना केदारी ताई जाधव नेहा किटे अंबिका नव्हाळेकर वैष्णवी बागुल मनीषा गुडेकर भावना गुडेकर वंदना गायकवाड आदींनी पक्षप्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण साळवे यांनी केले तर आभार राहुल खंदारे सर व किशोर भाऊ ठोकळे यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments