अभिनेता सुनील शेट्टी यांनी साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं घेतले दर्शन !


राजकुमार गडकरी 
शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डीत साई दर्शनासाठी  देशभरातून अनेक भाविक येतात. सोमवारी सुनील शेट्टी यांनी शिर्डीला भेट देऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वप्रथम मराठी भाषेबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं. ते म्हणाले की,"माझी जन्मभूमी कर्नाटक असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. मी इथे काम करतो, इथं मी वाढलोय. त्यामुळं मला मराठी येणं गरजेचं आहे.

 मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायची आहे". सध्या राज्यात हिंदी सक्तीवर वादंग उठलेलं असताना अभिनेता सुनील शेट्टीनं मराठीत बोलून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
 "पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घालावी, अशी ठाम भूमिका मी पहिल्यापासूनच घेत आहे. मी सुरुवातीपासून म्हणतो की, ज्या लोकांमुळं आपल्या देशाला त्रास होतो, अशा लोकांशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घातली पाहिजे. जोपर्यंत भारत-पाकिस्तानमधील वातावरण शांत होत नाही, तोपर्यंत केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर क्रिकेट, राजकारण, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रामध्ये पाकिस्तानशी संबंध तोडले पाहिजेत, " असं स्पष्ट शब्दात शेट्टी यांनी सांगितलंआहे.
म्हणून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलो : "साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाले की, "आज अनेक दिवसांनंतर साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. दरवर्षी साईंच्या दर्शनासाठी येत असतो. मात्र मध्यंतरीच्या काळात साईबाबांचं बोलावणं आलं नव्हतं. आज साईबाबांचं बोलावणं आल्यानं साईबाबांच्या दर्शनासाठी आलो. माझी पत्नी वर्षातून दोन वेळा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असते. आज साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला समाधान वाटलं आणि आनंद झाला. लवकरच सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे", असं सुनील शेट्टी म्हणाले, साई दर्शननंतर त्यांचा साई संस्थानच्या वतीने साई मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments