लोहगाव कोडीराम नेहे पाटील
संगमनेर तालुक्यातील औरंगपुर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पुंजाजी तळोले दोन जून रोजीवयाचे 65 वर्षे पूर्ण होत आहे .
अतिशय कष्टमय जीवन त्यांनी जगले ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात सेक्युरीटी विभागात वयाच्या साठ वर्षे नोकरी केली. अतिशय ग्रामीण भागात जन्मलेले भाऊसाहेब तळोले पावसाळ्यात देखील पाणीटंचाई असणाऱ्या गावांत उन्हाळ्यात पाणी टंचाई शंभर टक्के असतेच अशा
औरंगपूर गावात त्यांचा जन्म झाला परंतु जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांना घडवले. आपण दुष्काळी भागात जन्मलो याची त्यांनी कधी खंत बाळगले नाही कष्ट हे एक जीवन समजून त्यांनी आयुष्यभर शेतीचे व नोकरीत कष्ट केले आजही त्यांचे जीवन ठणठणीत आहे त्यांना 65 वर्षे पूर्ण झाली असा कोणीही म्हणू शकत नाही. जीवनात आनंद घ्यायचा असला तर संघर्षमय जीवन जगले पाहिजे न होणाऱ्या गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे आपण ही गोष्ट करू शकत नाही हे जगाला दाखवून दिली पाहिजे. न होणारी गोष्ट करणे व तिचा पाठलाग करणे याच्यातच खरे जीवन आहे .जीवनात सुखदुःख प्रत्येकाच्या पाठीमागे असते परंतु त्याच्यावर देखील आपण मात केली पाहिजे व हसतमुखाने समाजापर्यंत गेले पाहिजे आपण भेटायला गेल्याने
इतरांची आनंदी झाली पाहिजे अशा प्रकारे प्रत्येकाने जिवन जगले पाहिजे त्याचा आदर्श मध्ये भाऊसाहेब पुंजाजी तळोले.
0 Comments