दिलीप शिंदे
सोयगाव दि. 01- परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगाराच्या वतीने दि.01 रविवार रोजी सोयगाव बसस्थानक व आगारात एसटी (लालपरी) चा 77 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सोयगाव बसस्थानक साजविण्यात आले होते. बसस्थानकावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आगार प्रमुख मनीष जवळीकर तर प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख मोतीराम जोहरे उपस्थित होते.
यावेळी आगार प्रमुख जवळीकर यांनी एस टी महामंडळ देत असलेल्या समाजिक सवलतींचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घेऊन एसटी ने प्रवास करण्याचे आवाहन केले.तर मोतीराम जोहरे यांनी एसटी बद्दल आपले मनोगत व्यक्त करून एस टी संबंधित जुन्या आठवनींना उजाळा दिला.दरम्यान बसस्थानकावर फुलांनी सजविलेल्या एस टी सोबत केक कापून आणि प्रवाश्याना पुष्पगुच्छ देऊन पेढे वाटत मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी दगडू आस्वार, रंगनाथ देहाडराय,विजय जोशी, योगेश बोखारे, वाहतूक निरीक्षक सतिश अंभोरे, लिपिक सतिश पाटील, शेख नसीम, समाधान जाधव, जयराम सूर्यवंशी,ज्ञानेश्वर वाडेकर, मधू शिंदे,माणिक मुरमुरे, दिनकर लवटे,गौतम बनसोडे, जोहेब तडवी, अशोक तायडे, एसटी चालक, वाहक यांचे सह प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सतिश पाटील यांनी केले. समाधान जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल पगारे, नाना शेरे व सतिश नेरपगारे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments