समाजासाठी त्याग आणि समर्पण करणाऱ्या अहिल्याबाई होळकरांची समाजाला विचाराची गरज : ॲड. धायगुडे



दिलीप लोखंडे 
टाकळीभान प्रतिनिधी: समाजासाठी त्याग आणि समर्पण करणाऱ्या अहिल्याबाई होळकर व त्याचबरोबर सर्व महापुरुषांच्या विचाराची समाजाला गरज असून, समाजाने त्यांच्या विचारास अनुरूप आचरण करावे, असे आवाहन प्रख्यात नामवंत व्याख्याते ॲड. अविनाश धायगुडे यांनी केले. 
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने स्व. भास्करराव गलांडे पाटील सभागृह, टाऊन शाखा श्रीरामपूर येथे आयोजित 
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे होते तर व्यासपीठावर लोकसेवा आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे, माजी नगरसेविका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, अशोक बँकेचे ॲड. सुभाष चौधरी, व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर,
माजी सभापती डॉ. सुनिता गायकवाड, लोकसेवा आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटिल,  गणेश छल्लारे, बाबा गोराणे यांची उपस्थिती होते.
श्री. मुरकुटे म्हणाले की, अहिल्याबाई होळकरांना आठवण करण्यासाठी व सर्वच घटकापर्यंत त्यांचे व सर्वच महापुरुषांचे जीवनकार्य समाजापर्यंत पोहचविण्यासाठी व्याख्याने आयोजीत करावी. त्यातून काहीतरी समाजाला बोध घेता येईल व खऱ्याअर्थाने महापुरुषांची पुण्यतिथी, जयंती साजरी होईल. 
ॲड. धायगुडे पूढे म्हणाले, अहिल्याबाई ह्या समाजसुधारक व शुरविर होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म. एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी,समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता ,समता व न्याय या तत्त्वाप्रमाणे राज्य केले.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत असताना त्यांना सतीसारख्या प्रथांना अगदी जवळून तोंड द्यावं लागल. 
पूढे म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांच्या समान न्याय दानाबद्दल राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील प्रभावीत होते. अहिल्याबाई या उत्कृष्ट न्यायदात्या तसेच उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या आयुष्यात सामान्य जनतेवर अन्याय होईल असं त्या कधीच वागले नाही. महान कर्तुत्व नजरेसमोर ठेवून पुरुषांमध्ये जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यकर्ते म्हणून महत्त्वाच स्थान तेवढेच महिलांमध्ये राजमाता अहिल्याबाईंना राज्यकर्ती म्हणून महत्त्वाचे स्थान आहे, असे मत धायगूडे यांनी मांडले.
यावेळी भाऊसाहेब उंडे, बाबासाहेब आदिक, रामभाऊ कासार, काळे, संगीता शिंदे, शालिनीताई कोलते, भगवान सोनवणे, गणेश भाकरे, शनेश्वर पवार  आदी महिला, धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय सूचना 
खिर्डीचे सरपंच सचिन राऊत, सूत्रसंचालन प्रताप भवार यांनी तर गणेश छल्लारे यांनी आभार मानले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसेवा विकास आघाडी व सकल धनगर समाज आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments