छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील गोशाळा संचालकांची मार्गदर्शन बैठक उत्साहात संपन्न--

दिलीप शिंदे 
सोयगाव दि.25 - छत्रपती संभाजीनगर गोशाळा महासंघ यांच्या वतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या 46 गोशाळा संचालकांना मार्गदर्शन बैठकीचे दि.25 रविवारी दुपारी तीन ते पाच या काळात विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत कार्यालय खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र गोसेवा आयोग तथा संयोजक गोशाळा महासंघ डॉ.सुनील सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान गो मातेचे पूजन करून मार्गदर्शन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. परिपोषण योजने अंतर्गत जिल्हयातील ज्या गोशाळांना अनुदान प्राप्त झाले आहे त्यांनी ते अनुदान गोमतेच्या परिपोषणासाठी खर्च करावे व त्याचा लेखाजोखा योग्य पध्दतीने लिहुन ठेवावा. व्यवहार करतांना सेल्फ चा वापर न करता चेक द्वारे व्यवहार करावे व व्यवहार करतांना पारदर्शकता ठेवावी अशा सूचना डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी गोशाळा संचालकांना मार्गदर्शन करताना दिल्या. ज्या गोशाळा महाराष्ट्र गोशाळा आयोगाकडे नोंदणीकृत आहे परंतु त्यांना परिपोषण योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी परिपोषण योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी बैठकी दरम्यान केले.  गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना व गोशाळा महासंघ याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी गोशाळा संचालकांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तर देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उल्हास बोराडकर यांच्यासह जिल्ह्यातील 30 गोशाळेचे संचालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments