शिर्डी. (वार्ताहर)
उत्तर नगर जिल्हा सामाजिक समरसता मंच आयोजित मोफत आरोग्य शिबिर साई आश्रया ह्या वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम संस्थेत आज रविवारी 18 मे रोजी सकाळी 10.00 ते 2.00 या वेळेत संपन्न झाला. श्री साईनाथांच्या आरतीने मोफत आरोग्य शिबिराचा प्रारंभ झाला.
या शिबिरासाठी डॉ. श्री राजेंद्र श्रीमाळी, डॉ. आयुष श्रीमाळी, डॉ. यश श्रीमाळी, डॉ. ऐश्वर्या शिंगी, डॉ. सुजाता बसवेकर, डॉ. ज्ञानेश्वरी डांगरे या डॉक्टरांनी रुग्ण तपासणी करून औषध उपचार केले. साई आश्रया वृद्धाश्रमातील जवळजवळ 45 वृद्धांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. साई आश्रया संस्थेचे चेअरमन श्री गणेश दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरासाठी सामाजिक समरसता संयोजक श्री वसंत कदम, सहसंयोजक श्री विठ्ठल जाधव, सदस्या रजनीताई गोंदकर, सुवर्णाताई म्हस्के, सुनिता ताई जैन, उमाताई वहाडणे, उषाताई शिंदे, शुभांगी ताई कदम, ललिता ताई जाधव, अनिलजी पिपाडा , रघुनाथजी गोंदकर, राजेंद्र पवार, महेश जाधव सर आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय उमाताई वहाडणे यांनी करून दिला. सामाजिक समरसता संयोजक श्री वसंत कदम यांनी असे समाजाभिमुख कार्यक्रम यापुढेही आयोजित करणार असल्याचे सांगितले. श्री गणेश दळवी यांनी सामाजिक समरसता मंचाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा मंडळ सदस्या
जयमाला ताई कुलकर्णी यांनी केले. श्री गणेश दळवी यांनी सामाजिक समरसता मंचाचे विशेष आभार मानले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला.
0 Comments