आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारत मातेचे भूषण - मयुर पटारे

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान गावचे सुपुत्र चि. योगेश शिवाजीराव पटारे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात ग्रामस्थांच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे म्हणाले की भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान हे भारत मातेचे भूषण असून त्यांचा आपुलकीने सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. उदरनिर्वाहासाठी भरपूर पगाराच्या अनेक नोकरीचे पर्याय उपलब्ध असताना देखील योगेश पटारे यांनी सैन्य दलात सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर सर्व कठीण निवड चाचण्या पार करून ते जवान म्हणून सैन्य दलात रुजू होणार आहेत याचा सर्व टाकळीभानकरांना अभिमान आहे. गावातील युवकांनी त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैन्य दलात भरती व्हावे असे ते म्हणाले.

याप्रसंगी संत सावताचे संचालक विलास दाभाडे, सेवा संस्थेचे चेअरमन एकनाथ पटारे, संजय पटारे, तुकाराम बोडखे, शिवाजीराव पटारे, शाखाधिकारी दिनकर पवार, सुभाष ब्राह्मणे, आनंद कांबळे, गणेश चितळकर, संदीप बनकर, नितीन दहे, सचिन दहे, वैभव दाभाडे, वैभव रणनवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments