दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.04 - खरिपात उत्पन्न हाती आले नाही त्यातच रब्बी हंगामावर अवकाळीचे संकट यामुळे हताश झाल्याने विषारी औषध प्राशन करून उपचार घेत असलेल्या 35 वर्षीय महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे दहा वाजता घडली. गुढीपाडव्याच्या दिवशी( दि.30)या महिला शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेत विष प्राशन केले होते.
प्रतिभा बापू मघ( वय 35 ) असे कर्जबाजारी महिला शेतकऱ्याचे नाव आहे त्यांच्या कडे घोसला शिवारात चार एकर क्षेत्रात जमीन आहे .
त्यांचेकडे खासगी आणि बँकांचे मिळून दोन लक्ष पन्नास हजार रु कर्जाचा बोजा डोक्यावर आहे परंतु खरिपात कपाशी पिकांचे झालेले नुकसान आणि रब्बी हंगामात अवकाळी पावसाने उत्पन्न हाती येणार नसल्याने नैराश्याने या महिलेने विष प्राशन केले. दरम्यान तिला पाचोरा जि जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार दरम्यान तिचा शुक्रवारी सकाळी दहा वाजता रुग्णालयात मृत्यू झाला शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यची नोंद करण्यात आली आहे घटनेचा अद्यापही महसूल ने पंचनामा केलेला नव्हता शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या पश्चात पती,सासू, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments