संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित किशोर काळे आयबीपीएस परीक्षेत उत्तीर्ण--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.04 - येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात शिकत असलेला रोहित किशोर काळे हा विद्यार्थी आयबीपीएस परीक्षेत उत्तीर्ण होऊन बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.
     त्याचा यशाबद्दल अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे, सचिव प्रकाश काळे, प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
 या परीक्षेत यश संपादन करण्यासाठी रोहित काळेला  वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. निलेश गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
रोहित काळेचे आज समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments