दिलीप लोखंडे 
टाकळीभान- प्रतिनिधी - टाकळीभान येथील न्यू  इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पा. कनिष्ठ महाविद्यालचे विद्यमान प्राचार्य बबनराव तात्याबा इंगळे  वयोमानानुसार व संस्थेच्या नियमाप्रमाणे ३४ वर्ष प्रदीर्घ रयतेच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.

 प्राचार्य इंगळे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. २ एप्रिल २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून रयत शिक्षण  संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने ,रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विकास अधिकारी काकासाहेब वाळुंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थानिक स्कूल  कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली सेवापूर्ती व कृतज्ञता  सोहळा  उत्साहात  साजरा करण्यात आला.
        या कार्यक्रमाला बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार, डॉ, श्रीकांत भालेराव ,स्थानिक स्कूल कमिटीचे राहुल पटारे माजी सरपंच मंजाबापु थोरात  टाकळीभान सेवा संस्थेचे चेअरमन एकनाथ पटारे व इंगळे परिवार मोठ्या संख्येने प्रमुख उपस्थिती होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक संतोष जरे सर यांनी केले. 
         विद्यालयातर्फे प्राचार्य बी. टी. इंगळे त्यांच्या सुविद्य पत्नी शोभाताई  इंगळे यांचा स्नेहवस्त्र व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच रयत शिक्षण संस्थेच्या रयत को-ऑपरेटिव्ह बँक शाखा श्रीरामपूर तर्फे सरांना चांदीचे नाणे व शाल श्रीफळ आणि गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. 
    याप्रसंगी इंगळे सर यांची सुकन्या गौरीताई हिने सरांविषयी त्यांच्या भूतकाळातील स्मृतींना उजाळा दिला सर सर्वात लहान असूनही त्यांचे कर्तृत्व किती महान आहे हे सर्वांना समजून सांगितले व बाप म्हणून सरांनी दिलेले प्रेम आणि आठवणींना उजाळा देत असताना गौरीताई भाऊक झाल्या. 
           शिक्षक प्रतिनिधी म्हणून विभाग प्रमुख बनकर सुनील अण्णासाहेब यांनी पितृतुल्य प्राचार्य व उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून सरांचे वेळोवेळी झालेले मार्गदर्शनाविषयी  कृतज्ञता व्यक्त केली  आणि असा अधिकारी होणे नाही अशी आपली भावना व्यक्त केली .
 लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे व शाळेतील विद्यालयातील चांगल्या व गरजेच्या गोष्टींना नेहमी सकारात्मक प्रसिद्धी देणारे  पत्रकार बंधू यांच्या वतीने सरांचा शाल पुष्प देऊन सपत्नीनिक सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
      जि. प. प्रा. केंद्र शाळेचे , श्रीरामपूरचे शिक्षक वाघमोडे सर यांनी आपले गुरुवर्य प्रा. इंगळे सर यांच्या विषयी स्वतः त्यांचा विद्यार्थी असल्याकारणामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता पूर्ण भावना व्यक्त केल्या व देऊळगाव सिद्धी सारख्या इतक्या दूर अंतरावर असलेल्या छोट्या गावातून या टाकळीभान गावांमध्ये विद्यालयात सर्वप्रथम हजर राहणाऱ्या प्राचार्य तोंड भरून कौतुक केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या दिल्या
          रयत शिक्षण संस्थेचे गुणवत्ता विकास प्रमुख काकासाहेब वाळुंजकर यांनी सच्चा रयत सेवक उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून इंगळे सर यांचा परिचय करून दिला तसेच रयत शिक्षण संस्था सध्याच्या युगात मुंबई कशी आधुनिकतेकडे व गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे याविषयीचा इतिवृत्तांत समजावून सांगितला  आणि उत्तर विभाग दिवसेंदिवस संस्थेमध्ये प्रथम क्रमांकावर विराजमान झाल्याविषयीचे समाधान त्यांनी व्यक्त केले 
   मीनाताई जगधने मॅडम यांनी बोधकथा सांगून मुलांना हसत खेळत शिक्षणातील प्रगती समजावून सांगितली तसेच शिक्षण क्षेत्रात भविष्यातील येऊ घातलेली आव्हाने यावर प्रकाश टाकला आणि पत्रकारांचे कौतुक केले व मुख्याध्यापक सरांना शुभेच्छा दिल्या तसेच आता पुढील आयुष्यात सौ. शोभाताई इंगळे मॅडम यांना घेऊन थोडे दिवस पर्यटन करण्याचाही सल्ला दिला, जेणेकरून नेहमीच्या चाकोरेबद्ध जीवनाच्या बाहेर येऊन जीवनाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला प्राचार्य बी.टी. इंगळे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व क्षेत्रातील मंडळींबद्दल बोलताना जगधने ताईंनी सरांच्या नेतृत्वगुणांचा व उत्तम प्रशासक म्हणून असलेल्या गुणांचे कौतुक केले .
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनवणे व्ही एच व पाचपिंड एम. ए. यांनी केले तर काळे सर यांनी आभार मानले प्राचार्य इंगळे सर यांनी मुलांसाठी स्वादिष्ट असे भोजन दिले.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)