लोहगाव ( वार्ताहर)
श्रीक्षेत्र पिंपळदरी येथील येडूमातेच्या जत्रेचामार्ग न बदलता जत्रा येडूआई गडावरच भरु दया व कंदुरी साठी आदिवासींना येडुआई गडावरच मुक्काम करू द्या जो कोनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करन्याचा प्रयत्न करीत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असा आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर प्रांत अधिकार्यांना दिला आहे.त्या मुळे १३ एप्रील रोजी होणाऱ्या येडूआई यात्रेचा मार्ग मोकळा झाला आहे.
संपुर्ण महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पिंपळदरी ता.आकोले येथील येडूमातेची जत्रा ११ एप्रील ते १३ एप्रिल रोजी संपन्न होत आहे.परंतू पिंपळदरी ग्रामपंचायत,येडूआई देवस्थान, विविध कार्यकारी सोसायटी यांनी जत्रेत येणार्या आदिवासींचा मार्ग बदलून घारगाव ते कोठा, कोठा ते वणकुटे मार्गे जांभळदरा पिंपळदरी असा जवळपास १५ की.मी.असलेला मार्ग बदलला होता.तसेच येडूआई गडावर कंदुरी साठि आलेल्या भाविकांना गडावर मुक्काम करन्यास मनाई करून गावाजवळ तंबू टाकून कंदुरी कराव्यात असा संदेश शोषल मिडीयावर टाकला होता.त्या मुळे आदिवासी भिल्ल समाजाच्या भावना तीव्र झाल्या होत्या. एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी पिंपळदरी ग्रामपंचायत, येडूआई देवस्थान व तेथील स्थानिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.त्या मुळे या यात्रेकडे संपुर्ण महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाचे लक्ष लागले होते.एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे,आदिवासी एकता परीषदेचे संस्थापक कैलास दादा माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत जाधव,येडूआई अन्नछत्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी लोणी येथे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले व यात्रेत होनार्या हस्तक्षेपामुळे आदिवासींच्या भावना भडकू शकतात असे सांगितले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालक मंत्र्यानी थेट संगमनेर प्रांत अधिकारी यांना फोन करून येडूआई यात्रेत हस्तक्षेप होऊ देऊ नका आणि कोणीही तसे करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशा जाहीर सुचना दिल्या.त्या मुळे संपूर्ण राज्यातील आदिवासी भिल्ल समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे . तसेच यात्रेचा मार्ग आता मोकळा झाला आहे .त्या मुळे एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे .)
0 Comments