शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी के साईबाबा हा चित्रपट काढून श्री साईबाबांची महती संपूर्ण जगामध्ये पोहोचवणारे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईत निधन झाले असून त्यांच्या निधनाचे वृत्त शिर्डीत येताच शिर्डीत साईभक्त, ग्रामस्थ व परिसरातून मोठे दुःख व्यक्त होत आहे. शिर्डी व परिसरातील सर्व क्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने ही शिर्डीत स्व.मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
'रोटी, कपडा और मकान' आणि 'क्रांती' सारखे उत्कृष्ट चित्रपट देणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. 'पूरब और पश्चिम' चित्रपटातील 'भारत का रहे वाला हूं, भारत की बात सुनाता हूं' हे गाणे आजही सर्वांच्या ओठावर आहे. 'दो बदन', 'हरियाली और रास्ता' आणि 'गुमनाम' सारख्या हिट चित्रपटांसाठीही ते ओळखले जात.भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. देशभक्तीपर चित्रपटांसाठी त्यांची ओळख होती. देशभक्तीपर चित्रपटांसाठी त्यांना 'भारत कुमार' म्हणूनही ओळखले जात होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्तानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
., 'भारत कुमार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने शुक्रवारी पहाटे ४.०३ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मनोज कुमार गेल्या काही महिन्यांपासून यकृत सिरोसिसने त्रस्त असल्याची पुष्टीही अहवालात करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनोज कुमार यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांच्या नावावर विविध श्रेणींमध्ये एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर पुरस्कार आहेत. भारतीय कलेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांना २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल ‘महान दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी, आमचे प्रेरणास्थान आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे 'सिंह' मनोज कुमारजी आता आमच्यात नाहीत. हे चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान आहे आणि संपूर्ण इंडस्ट्रीला त्याची उणीव भासेल. अशा प्रतिक्रीया चित्रपट सृष्टीतून येत आहे. तर, ब्लॅक अँड व्हाईटच्या पिढीतला अखेरचा शोमॅन गेल्याची भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली.
दरम्यान मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. अनेक उत्तम देशभक्तीपर चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तर, शिर्डी के साईबाबा हा चित्रपट काढून शिर्डीच्या श्री साईबाबांची महती जगभरात पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचे नाव शिर्डी येथील साईमंदिर परिसरातील रस्त्याला देखील देण्यात आले आहे. शिर्डीत मनोज कुमार यांची भव्य मिरवणूक काढून त्यांच्या उपस्थितीत पिंपळवाडी रोडला मनोज कुमार पथ असे नाव देण्यात आले होते. मनोज कुमार यांच्यामुळे शिर्डी सर्व जगात प्रसिद्ध झाली.
ते निस्सिम साईभक्त होते. त्यांचे निधन झाल्याचे वृत्त शिर्डीमध्ये येताच शिर्डीतील ग्रामस्थ साईभक्त व परिसरातूनही मोठे दुःख व्यक्त होत आहे. शिर्डी परिसरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थान च्या वतीने ही स्वर्गीय मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या दुःखद निधनानंतर शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने संस्थानच्या शताब्दी मंडपात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments