दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपुर तालुक्यातील भोकर येथे एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांची होत असलेली गैरसोय, तसेच शालेय वर्षाच्या सुरूवातीला महाविद्यालयीन विद्यार्थिनींची होत असलेली हेळसांड यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सरपंचासह विविध बचत गटांच्या महिलांनी बेट श्रीरामपूर आगार प्रमुखांना भोकर येथे प्रत्येक एस.टी. बसला थांबा द्या, अशी मागणी सरपंच शितल पटारे सह महिलांनी केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असलेल्या एस.टी. महामंडळाला दरवर्षीच भोकर शिवारातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विसर पडतो. जूलै महिन्यात महाविद्यालये सुरू झाली की, या परीसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची हेळसांड सुरू होते. दरवर्षी श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर भोकरफाटा येथे कधी विद्यार्थ्यांचे, कधी पालकांचे तर कधी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको सारखे आंदोलने झालेली सर्वश्रुत आहे. प्रत्यक्षात भोकर येथे परीसरातील घुमनदेव, कमालपूर, जगतापवस्ती, वडजाई वस्ती, पटारे वस्ती, हनुमानवाडी, चौधरीवस्ती, पठाणवस्ती, शेळकेवस्ती, काळे वस्ती, खेडकरवस्ती, चव्हाणवस्ती, टेलटैंक या वाड्यावस्त्यासह श्रीक्षेत्र अडबंगनाथ देवस्थान, श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान व आशांकूर महिला केंद्र या ठिकाणाहुन दररोज प्रवाशांची ये-जा चालु असते. त्यानुसार वाढत्या लोकसंख्येचा विचार करून एस.टी.महामंडळाने नियोजन करण्याची गरज आहे. यापूर्वी महाविद्यालये सुरू झाल्यानंतर श्रीरामपूर डेपोतून सकाळी ६.४५ वाजता कमालपूरहून एस.टी. बस यायची ती आता
पहाटे सहा ते सव्वा सहा वाजताच रिकामी श्रीरामपूरकडे जाताना दिसते. महाविद्यालय आठ वाजता सुरू होत असल्याने, या पहाटेच्या गाडीने विद्यार्थी व विद्यार्थीनी गेल्यास सकाळचे दोन तास त्यांनी कुठे थांबायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यानंतर सकाळी ७.१५ वाजता स्वतंत्र महाविद्यालयीन विद्याध्यर्थ्यांसाठी बस सुरू होती, ती सध्या बंद आहे. शिवाय सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना पोहच करण्यासाठी सायंकाळी ४ वाजता स्वतंत्र भोकर एस.टी. बस यायची ती ही बंद आहे. तसेच रात्री ८ वाजताची श्रीरामपूर-नेवासा एस.टी. बंद झाल्याने या मार्गासाठी सायंकाळी सात नंतर
कुठलीच एस.टी. नसल्याने उशिराने शहरात पोहचलेल्या प्रवाशांना खेड्यात जाण्याची सुविधा नसल्याने त्यांचे हाल होत आहे. त्यामुळे दरवर्षीच्या आंदोलनांना पालक कंटाळल्याने आता चक्क येथील महिलांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.
येथील सरपंच शितल पटारे, आशांकूरच्या रेखा थोरात, सिस्टर अग्रेस, कल्पना अस महाविद्यालयावा, ललिता अहिरे, जया ओहोळ, अलका अमोलिक, मीनाक्षी चव्हाण, मिराबाई बारगळ, शांता जाधव, निर्मला चांदेकर, प्रकाश चौधरी, संतोष अमोलिक आदींनी श्रीरामपूर डेपोचे व्यवस्थापक अनिल बेहेरे यांना निवेदन देवून ही मागणी केली आहे.
0 Comments