मित्रामुळे लग्न तुटले ,वधूची सटकली वराच्या श्रीमुखात भडकावली,

दिलीप लोखंडे 

 टाकळीभान प्रतिनिधी- नगर शहरात लग्नाच्या बस्त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तीन मजली एस. सी. कापड दुकानात नव वधू-वरांचा बस्ता सुरु होता. बस्त्याचे बिल झाले मात्र वराच्या मित्राने भारी ड्रेस घे म्हणत २० हजाराच्या ड्रेसची गळ घातली. वधू पित्याने काही पैशाचे सोने घेवू अशी भूमिका घेवू तेव्हा वराने होणाऱ्या सासऱ्याचा अपमान केला. 

यावेळी सुशिक्षीत वधूची सटकली तिने थेट नववराच्या श्रीमुखात भडकावली आणि मित्रामुळे लग्न तुटले. सुशिक्षीत वधूने तिच्या वडिलांना २० हजाराचे कपडे घेतले आणि मित्राच्या नादी लागणाऱ्या वराबरोबर लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार देत लग्न तुटल्याचे सुनावले. बिचारा वर मान खाली घालून बस्ता न होताच पस्तावत निघून गेला. मित्र तर धूम ठोकून पळाले. हा प्रकार काल घडला.

Post a Comment

0 Comments