राज्यस्तरीय सर्व पंथीय ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन




महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद व साप्ताहिक उपदेशकचा उपक्रम

संगमनेर- महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद व साप्ताहिक उपदेशक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ मे रविवारी रोजी सकाळी १० वाजता पंचवटी हॉटेल, संगमनेर येथे राज्यस्तरीय सर्व पंथीय ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
 असल्याची माहिती ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले व साप्ताहिक उपदेशकचे विक्रम गायकवाड यांनी दिली. या मेळाव्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, मेळाव्याचे उद्घाटन सेंट मेरी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो.गायकवाड यांच्या हस्ते होणार असून मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुधीर तांबे तर जॉर्ज क्षेत्रे, प्रकाश लोखंडे, लुकास पाटोळे, ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य फा.फ्रान्सिस पटेकर, संत ईग्नाथी चर्चेचे प्रमुख धर्मगुरू नेल्सन परेरा, प्रशांत शहाराव, मेथॉडिस्ट चर्चचे सतीश मिरजकर, पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पा. शिवाजी लांडगे, ग्रेगरी केदारी, प्रा.बाबा खरात,  दीपक शेळके,  विजय दारोळे, मच्छिंद्र जगताप, बी.के.गायकवाड, अँड.विजयानंद पगारे, बाळासाहेब घोडके, यशस्वी फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटगे, लाजारास केदारी, डॉ.अरविंद सांगळे, राजीव साळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
             या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दीपक कदम, प्रशांत यादव, सनी गायकवाड, फेड्री फर्नांडीस, अन्तोंन भोसले, प्रभाकर चांदेकर, सुहास गायकवाड, मार्कस बोर्डे, सचिन मुन्तोडे, सिमोन रूपटक्के, भाऊसाहेब नेटके, सुरेश गायकवाड, सुरेश ठुबे आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments