इ . ५ वी व इ .८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, टाकळीभानचे २३ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक




दिलीप लोखंडे 
टाकळीभान प्रतिनिधी- : रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान  येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ ५वी च्या १ व  इ ८ वीच्या 22 अशा एकूण २३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून विद्यालयाच्या वतीने नुकताच   या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  आर . एम . शिंदे तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस . एस .जरे होते .
          इ . 5  वी ची विद्यार्थी कु . तन्वी गलांडे  हिने   जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ४० वा क्रमांक मिळविला व इयत्ता आठवीचे 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहे .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याधपक आर . एम. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा विद्यालयाचा लागलेला निकाल अभिमानास्पद आहे . पुढील शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन  आर . एम .शिंदे यांनी केले . शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुतार यु .टी ., एस .पी .कोकाटे आदी उपस्थित होते . सूत्रसंचालन जी .एस .काळे यांनी तर आभार एन .पी . चौधरी यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments