घोगरगाव येथे त्रिमूर्ती विद्यालय गुरुपौर्णिमा साजरी

दिलीप लोखंडे 

टाकळी भान प्रतिनिधी -त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोगरगाव येथे आज  गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. 
    गुरु पौर्णिमे निमित घोगरगाव येथील  संत बहिरा जातवेद संस्थांनचे मठाधिपती बाल संन्याशी ह.भ.प.विश्वनाथ गिरीजी महाराज यांचे विद्यालयात आमंत्रित करून त्यांचे पूजन करण्यात आले. महाराजांनी अध्यात्म व वैयक्तिक जीवन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
     या कार्यक्रमाचे नियोजन इ. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरु विषयी महिमा विषयी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन स्नेहल पटारे व सोफिया पठाण या विद्यार्थिनींनी केले.  श्रीमती अर्चना जगताप यांनी प्रास्ताविक व गुरुपौर्णिमेविषयी माहिती दिली. तसेच सर्व गुरुजन वर्गाचे विद्यार्थ्यांनी  सत्कार केला. सर्व विद्यार्थ्यांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य  संतोष जावळे सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments