दिलीप लोखंडे
टाकळीभान:- प्रतिनिधी - महसूल विभागा कडील वाढत्या तक्रारींचा जागेवर निपटारा व्हावा, आणि नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी, यासाठी शिवाजी महाराज स्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार शेकटकर होते.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे १० जुलै रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाघ बोलत होते. तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांच्या
हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन व विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्रा. जयकर मगर, बापूसाहेब शिंदे, गजानन कोकणे, ग्रा.प.सदस्य भाऊसाहेब पटारे, ऍड धनराज कोकणे,भैय्या पठाण,अनिल बोडखे, भाऊराव गव्हाणे, शिंदे,बी बी गोसावी, मंडळाधिकारी रजनी आघाव, तलाठी रूपाली रामटेके, ग्राम महसूल अधिकारी अशोकराव चितळकर ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भालदंड, कोतवाल सदाशिव रणनवरे, संदिप जाधव आदींसह लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मिलींदकुमार वाघ म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेतील आडचणी व तक्रारी, राहिवाशी दाखले, नवीन रेशनकार्ड वाटप, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, सामाजिक लाभाच्या योजनेच्या तक्रारी, जिवंत ७/१२ वाटप, फेरफार उतारे व महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करून जागेवर निपटारा करून दाखले देण्यात येणार आहेत. या शिबिरामुळे महसूल मंडळातील नागरिकांच्या पैशाची व वेळेची बचत होणार असल्याने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाघ यांनी केले.
यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे म्हणाले कि, शासनाकडुन ग्रामिण भागातील नागरीकांच्या समस्या सोडण्यासाठी अशा प्रकारचे शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतले जातात. मात्र केवळ१० ते १५ टक्के नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात बाकी नागरीकांना मात्र शासन दरबारी चकरा माराव्या लागतात. त्यामुळे या कार्यक्रमात जास्तीत जास्त तक्रारी निकाली काढाव्यात अशा सूचना कोकणे यांनी महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांना केल्या
यावेळी नायब तहसिलदार शेकटकर, बी बी गोसावी यांनी या अभियानाची माहीती दिली तर पशुसंवर्धन विभागाचे डा. निर्मळ, कृषी विभागाचे धुमाळ यांनी योजनांची माहीती दिली.
या शिबिराची वेळ सकाळी १० वाजताची दिल्याने वृध्द नागरीक सकाळी १० वाजताच कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते. मात्र दोन तास उलटूनही वरिष्ठ अधिकारी तहसीलदार न आल्याने नागरिक व पत्रकार यांना ताटकळत थांबावे लागले. अखेर ताटकळत थांबलेल्या पत्रकारांनी खडेबोल सुनावताच उपस्थित नायब तहसीलदार शेकटकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला .
0 Comments